इंडियन प्रीमियर लीग २०२३ सुरु होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी बाकी आहे. अशातच खेळाडूंनी त्यांच्या टीमसोबत राहून रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलचं १६ वं सीजन ३१ मार्च २०२३ पासून सुरु होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या सर्व घडामोडींच्याआधी आम्ही तुम्हाला अशा चार खेळाडूंबाबत सांगणार आहोत, ज्यांचं करिअर आता संपलं आहे.

तिरुमलासेट्टी सुमन

Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर फलंदाज तिरुमलासेट्टी सुमनच्या नावाची नोंद आहे. त्याने हैद्राबाद डेक्कन चार्जर्ससाठी मोठी खेळी केली होती. २००९ मध्ये सुमनने आयपीएलमध्ये २३७ धावा केल्या होत्या. २०१० मध्ये त्याने ३०७ धावांची कामगिरी केली होती. पण त्यानंतर सुमनने खराब कामगिरी करत मुंबई इंडियन्ससाठी सात इनिंगमध्ये फक्त ६५ धावा केल्या. या कारणास्तव सुमनला आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही संधी मिळाली नाही.

कामरान खान

वेगवान गोलंदाज कामरान खानला राजस्थान रॉयल्सने वर्ष २००९ मध्ये खरेदी केलं होतं. त्यावेळी कामरानने १४० किमी प्रति तास वेगानं भेदक गोलंदाजी करत क्रिकेटच्या मैदानात छाप टाकली होती. कामरान २०११ मध्ये पुणे टीममध्ये खेळण्यापूर्वी २०१० पर्यंत राजस्थान रॉयल्ससाठी खेळला. पण त्यानंतर कामरानला प्रभावीपणे कामगिरी करता आला नाही. त्यामुळे कामरानला क्रिकेटपासून दूर राहावं लागलं.

नक्की वाचा – …म्हणून एम एस धोनी IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार, ‘या’ लिस्टमध्ये रोहित शर्मा पिछाडीवर, जाणून घ्या यामागचं कारण

मोहित शर्मा

आयपीएल २०१४ मध्ये मोहित शर्मा परपल कॅप विनर होता. मोहितला एका जमान्यात अप्रतिम गोलंदाज म्हणून ओळखलं जायचं. पण २०१५ मध्ये मोहितला कोणत्याही संघांनी खरेदी केलं नाही. ३३ वर्षीय मोहितला आयपीएल कॉन्ट्र्क्ट मिळालं नाही. मोहितला आयपीएलमध्ये पुन्हा संधी न दिल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटवला होता.

मनप्रीत गोनी

मनप्रीत गोनीने वर्ष २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. गोनीने २००८ मध्ये आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर टीम इंडियात जागा पक्की केली. परंतु,याचदरम्यान त्याने हॉंगकॉंग आणि बांग्लादेशच्या विरुद्ध एक संधी मिळाली. गोनी हैद्राबाद डेक्कन चार्जर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. परंतु, २००८ मध्ये सीएसकेमध्ये संधी मिळाल्यानंतर गोनीला चांगली कामगिरी करता आली नाही.