काळानुरुप क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. पुर्वी कसोटी आणि वन-डे सामन्यांपर्यंत मर्यादीत असणाऱ्या क्रिकेटमध्ये आता टी-२० क्रिकेटने प्रवेश घेतला आहे. टी-२० क्रिकेटला मिळणाऱ्या वाढणाऱ्या प्रतिसादामुळे कसोटी क्रिकेटचं भवितव्य धोक्यात येणार की काय अशा चर्चांना उधाण आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र कसोटी क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही आजही महत्वाची बाब मानली जाते. अनेक खेळाडू आजही कसोटी संघात आपल्याला जागा मिळण्यासाठी धडपड करत असतात. मात्र कसोटी सामन्याच्या स्वरुपामुळे त्या यात धाा काढणं हे जिकरीचं होऊन बसतं. आज आपण अशा काही फलंदाजांची ओळख करुन घेणार आहोत, ज्यांची वन-डे सामन्यांमधली सर्वोच्च धावसंख्या ही कसोटी सामन्यातल्या सर्वोच्च धावसंख्येच्या जास्त आहे.

५. मार्क वॉ ( कसोटी १५३*, वन-डे १७३ )

२०००/०१ साली वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत मार्क वॉने केलेली १७३ धावांची खेळी ही आजही ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात महत्वाची खेळी मानली जात आहे. १४ षटकं हातात असताना मार्क वॉने आपल्या ठेवणीतले काही खास फटके खेळत आपलं शतकं साजरं केलं होतं. या मालिकेत मार्क वॉने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती.

४. सईद अन्वर ( कसोटी १८८*, वन-डे १९४ )

९० च्या दशकात सईद अन्वर हा पाकिस्तानी संघाचा कणा होता. वन-डे सामन्यांमधला विंडिजच्या सर विवियन रिचर्ड्स यांचा १८९ धावांचा विक्रम सईद अन्वरने सर्वप्रथम मोडला होता. भारताविरुद्ध चेन्नईच्या मैदानात सईद अन्वरने १९४ धावांची खेळी केली होती.

या सामन्यात भारतीय गोलंदाज सईद अन्वरसमोर अक्षरशः हतबल दिसत होते. भारतीय गोलंदाजांची तुफान धुलाई करत अन्वरने आपल्या कारकिर्दीतली सर्वोत्तम खेळी केली होती.

३. फॅफ डू प्लेसी ( कसोटी १३७, वन-डे १८५ )

केप टाऊनच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध डू प्लेसीने आपल्या वन-डे कारकिर्दीतली सर्वोत्तम खेळी केली होती. या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी डू प्लेसीला बाद करण्याचे अनेक प्रयत्न केले खरे, मात्र डू प्लेसीने त्यांना दाद लागू दिली नाही.

२. मार्टिन गप्टील ( कसोटी १८९, वन-डे २३७ )

आपल्या आक्रमक शैलीमुळे मार्टिन गप्टील हा न्यूझीलंडच्या संघातला एक महत्वाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. २०१५ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने केलेली २३७ धावांची खेळी ही आजही क्रीडारसिकांच्या स्मरणात आहे.

५० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळूनही गप्टीलला कसोटी संघात आपली जागा पक्की करता आलेली नाही. मात्र न्यूझीलंडसाठी वन-डे संघाचा तो एक महत्वाचा भाग मानला जातो.

१. रोहीत शर्मा ( कसोटी १७७, वन-डे २६४ )

२०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यात केलेल्या द्विशतकाच्या जोरावर रोहीत शर्मा वन-डे सामन्यात भारतासाठी हक्काचा सलामीवीर बनला. यानंतर वर्षभरातचं रोहीत शर्माने वन-डे सामन्यांमध्ये २६४ धावांची खेळी करत वन-डे सामन्यांमधलं आपलं महत्व अधिकाधीक ठळक केलं.

२०१३ साली रोहीत शर्माने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केलं होतं. मात्र रोहीत शर्माला वन-डे सामन्यांप्रमाणे कसोटी संघात आपलं संघात स्थान पक्क करता आलेलं नाही. कित्येकदा मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलूनही कसोटी संघातल्या सर्वोत्तम खेळाडूंमुळे रोहीत शर्माला संघात जागा मिळाली नाही.