ODI World Cup India vs Pakistan Match Man of the Match List: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १२वा सामना शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले होते. भारताने या सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाचा पाकिस्तानवरचा हा ८वा विजय आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली.

या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. या सामन्यात गोलंदाजी करताना बुमराहने ७ षटकांत १९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला ७ वेळा पराभूत केले होते. या सात सामन्यांमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड झाली होते, ते जाणून घेऊया.

Virat Kohli Babar Azam
‘क्रिकेट डिप्लोमसी’ सांधणार भारत-पाकिस्तान संबंध?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
IND vs AUS Andrew McDonald statement on Mohammed Shami
IND vs AUS : ‘मोहम्मद शमीची अनुपस्थिती भारतासाठी मोठा धक्का पण…’, ऑस्ट्रेलियन संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचे वक्तव्य
IND vs NZ Yashasvi Jaiswal breaks Virender Sehwag's record
IND vs NZ : यशस्वीने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम; सीनिअर खेळाडूंची मोडली सद्दी
PAK vs ENGPAK vs ENG Pakistan won the Test series at home after 3 years
PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनी मायदेशात जिंकली कसोटी मालिका, साजिद-नोमानच्या जोरावर इंग्लंडचा उडवला धुव्वा
chavadi nana patole future congress performance in maharastra assembly poll
चावडी : बिनधास्त नाना
eknath shinde attack uddhav thackeray
आपटीबार : हल्ला पुरे!
Kagiso Rabada completes 300 Test wickets
Kagiso Rabada : कागिसो रबाडाने केला विश्वविक्रम! बांगलादेशविरुद्ध नोंदवला ‘हा’ खास पराक्रम

१९९२ चा विश्वचषक –

१९९२ च्या विश्वचषकात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाकडून सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. या सामन्यात सचिनने प्रथम फलंदाजी करताना ५४ धावांची खेळी केली, त्यानंतर गोलंदाजीतही एक विकेट घेतली.

१९९६ चा विश्वचषक –

या वर्षी झालेल्या भारत-पाक सामन्यात नवज्योतसिंग सिद्धूला सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. या सामन्यात सिद्धूने ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती.

हेही वाचा – ICC World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हार्दिक पांड्या बनला अँकर, सिराज-बुमराहसोबत केली मजा; पाहा VIDEO

१९९९ चा विश्वचषक –

या तिसऱ्या विश्वचषकात झालेल्या पाकिस्तान-भारत सामन्यात व्यंकटेश प्रसादला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या सामन्यात व्यंकटेशने शानदार गोलंदाजी करत २७ धावांत ५ बळी घेतले होते.

२००३ चा विश्वचषक –

यावर्षी खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या सामन्यात सचिनने फलंदाजी करताना ९८ धावांची खेळी केली आणि भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

२०११ चा विश्वचषक –

२०११ च्या विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्यात चमकदार कामगिरी केल्याबद्दल सचिन तेंडुलकरला पुन्हा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात सचिनने ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले.

हेही वाचा – IND vs PAK सामन्याने रचला इतिहास, मोडला आयपीएल फायनलचा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिला सामना

२०१५ चा विश्वचषक –

या विश्वचषकात भारत-पाक सामन्यात विराट कोहलीला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या सामन्यात विराट कोहलीने १०७ धावांची शानदार खेळी केली होती.

२०१९ चा विश्वचषक –

२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक सामन्यात शानदार कामगिरी केल्याबद्दल रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात रोहित शर्माने १४० धावांची शानदार खेळी केली होती.