अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, कमलेश नागरकोटी, शिवम मावी यांसारखे क्रिकेटपटू आयपीएलच्या लिलावात करोडपती झाले. यावेळीही असेच काहीसे होणार आहे. यावर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत १९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार यश धुलसह अनेक क्रिकेटपटू रातोरात करोडपती होऊ शकतात. यात महाराष्ट्राच्या दोन क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
कर्णधार यश धुल, (दिल्ली) राज बावा, हरनूर सिंग (चंदीगड), राजवर्धन हंगरगेकर (महाराष्ट्र), विकी ओसवाल, कौशल तांबे (महाराष्ट्र), अनिश्वर गौतम (कर्नाटक), वासू वत्स (उत्तर प्रदेश) यांचा आयपीएल मेगा लिलावात समावेश करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारे डावखुरे वेगवान गोलंदाज रवी कुमार (बंगाल), अंगक्रिश रघुवंशी (मुंबई) आणि शेख रशीद (आंध्र प्रदेश) यांना या यादीत स्थान मिळालेले नाही.
हेही वाचा – IND vs WI : टीम इंडियात शाहरुख खान..! पहिल्या वनडेसाठी रोहितसेनेची घोषणा
जर कोणत्याही फ्रेंचायझीने बीसीसीआयला या क्रिकेटपटूंना लिलावात समाविष्ट करण्याची विनंती केली, तर त्यांना स्थान दिले जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८२ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११० धावा खेळणाऱ्या यश धुलची मूळ किंमत २० लाख आहे. हंगरगेकर वगळता सर्व खेळाडूंची मूळ किंमत २० लाख रुपये आहे. अष्टपैलू हंगरगेकरची मूळ किंमत ३० लाख इतकी आहे.