Nitin Menon on Team India: भारतीय अंपायर नितीन मेनन यांचे नाव चाहत्यांना माहित असेलच. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान मेनन यांच्या काही निकालांनी सामन्यात वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. हेच नितीन मेनन अंपायर आता सध्याच्या अ‍ॅशेस मालिकेत अंपायरिंग करताना दिसणार आहेत. अशा परिस्थितीत पीटीआयशी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य करत भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला आहे. मेनन म्हणतात की, “टीम इंडियाचे काही मोठे खेळाडू नेहमीच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.”

नितीन मेनन यांच्या या वक्तव्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या मार्चमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान कोहलीने मेनन यांच्यावर भाष्य केले होते, हे सर्वांनाच आठवत असेल. खरं तर, जेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला पायचीत (lbw)च्या अपीलवर मेनन यांनी नाबाद घोषित केले तेव्हा क्षेत्ररक्षण करत असताना विराट अंपायरच्या जवळ आला आणि म्हणाला की, “जर मी तिथे असतो तर तुम्ही मला आऊट दिले असते.” कारण अनेकदा अंपायर्स कॉलच्या नावाखाली विराट कोहलीला मेनन यांनी बाद म्हणून निर्णय दिला आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
Krunal Pandya in Pushpa 2 Tarak Ponappa looks like Indian Cricketer Know The Truth Behind Viral Photos
Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत नितीन मेनन म्हणाले, “जेव्हा टीम इंडिया भारतात खेळते तेव्हा खूप उत्साह असतो. भारतीय संघात असे अनेक स्टार्स आहेत जे नेहमी तुमच्यावर बाजूने निर्णय देण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, जेव्हा ५०-५० च्या निर्णयाची परिस्थिती असते तेव्हा ते निर्णय त्यांच्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न करतात परंतु जर आपण दबावाखाली शांत राहू शकलो तर आम्हाला काहीही त्याचा फरक पडत नाही, ते त्याचं काम करतात.”

हेही वाचा: Ambati Rayudu: अंबाती रायडूच्या आरोपांवर माजी निवडकर्ते एम. एसके. प्रसाद यांचे प्रत्युतर, म्हणाले, “टीम इंडियात जर पक्षपात…”

पुढे नितीन मेमन म्हणाले की, “अनेकदा टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी जरी दबाव टाकत असले तरी देखील मी कुठल्याही दबावाला बळी पडत नाही. मी योग्य जो निर्णय आहे तोच देतो.” असा खळबळजनक आरोप त्यांनी भारतीय संघावर केला.

नितीन मेनन अ‍ॅशेसमध्ये अंपायरिंग करणार

जून २०२० मध्ये ICC एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट झालेले नितीन मेनन कोरोनामुळे परदेशात जाऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत, ते भारताच्या बहुतेक देशांतर्गत सामन्यांमध्ये अंपायरिंग करताना दिसला, त्यांनी संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक सामन्यांमध्ये देखील अंपायरिंग केले आणि गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या होम सीरिजमध्ये अंपायरिंग करताना दिसले. जून २०२० पासून १५ कसोटी, २४ एकदिवसीय आणि २० टी२० सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे. आता अ‍ॅशेस २०२३ मध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी ते सज्ज आहेत. ते शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अंपायरिंगची भूमिका बजावतील.

Story img Loader