इंग्लडने बेन स्टोक्सच्या नाबाद शतकी (१३५ रन) खेळीच्या बळावर अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात एक गडी राखून ऑस्ट्रेलियावर ऐतिहासीक विजय मिळवला आहे. तत्पूर्वी हा सामना रंगतदार अवस्थेत आला होता.

या सामान्यात ऑस्ट्रेलिया विजयी होईल असे सुरूवातीला सर्वानाच वाटत होते. कारण,ऑस्ट्रेलिया दिलेल्या ३५९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे २ फलंदाज अवघ्या १५ धावांत तंबूत परतले होते. त्यानंतर कर्णधार जो रुट (७७) आणि जो डेन्ली (५०) यांनी संघाचा डाव सावरला. मात्र, हे दोघे तंबूत परतल्यानंतर बेन स्टोक्सने एकाकी झुंज देत १३५ धावा केल्या आणि इंग्लडला एक विकेट राखून ऐतिहासीक विजय मिळवून दिला. इंग्लडने हे लक्ष्य ९ गडी गमावून साध्य केले.

इंग्लडचा शेवचा खेळाडू लीचने स्टोक्सला अगदी चिवटपणे उत्तम साथ दिली. तो ९ बाद २८६ धावा असताना मैदानात उतरला व त्यानंतर शेवटपर्यंत विकेटवर अडून राहिला. त्याने १७ चेंडूत १ धावा केली. विशेष म्हणजे या जोडगळीने ७६ धावांची भागीदारी केली, ज्यात लीचच्या केवळ एकाच मात्र महत्वपूर्ण धावेचे योगदान आहे.

बेन स्टोकने २१९ चेंडूतील आपल्या  १३५ धावांच्या वादळी खेळीत ११ चौकार व तब्बल ८ षटकार लगावले. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या या मालिकेत १- १ अशी बरोबरी केली आहे.

 

Story img Loader