Danish Kaneria on Pakistan Team:  पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने हमासवरील हल्यावर केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. रिझवानने २०२३च्या विश्वचषकातील श्रीलंकेविरुद्धचा विक्रमी विजय हमास या संघटनेला समर्पित केला होता. यानंतर अहमदाबादमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघ भारताविरुद्ध खेळण्यासाठी आला, तेव्हा रिझवान मैदानातून परतत असताना भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ‘जय श्री राम’चा नारा दिला. आता जेव्हा भारताने पाकिस्तानला पराभूत केले तेव्हा त्यांच्या क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने यावर गंभीर आरोप करत त्याच्या वेदनाही व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तान संघातून खेळलेला हिंदूधर्मीय क्रिकेटपटू दानिश कनेरियाने अनेक ट्वीटमध्ये पाकिस्तान संघांच्या वागणुकीवर टीका केली आहे. त्याने अहमद शहजादचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू तिलकरत्ने दिलशानला इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला देताना दिसत आहे.

दानिश कनेरियाने ड्रेसिंग रूमची ब्लॅकलिस्ट आणि त्यांचे वाईट कृत्य उघड करताना लिहिले की, “ड्रेसिंग रूम असो, खेळाचे मैदान असो किंवा जेवणाचे टेबल, माझ्याबरोबर हे रोज घडत होते. २०१४ मध्ये डांबुला येथे झालेल्या पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात हा प्रकार घडला होता. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, श्रीलंकन ​​संघाचा फलंदाज दिलशान डाव संपल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने परतत आहे आणि त्याचवेळी अहमद शहजादने त्याला धर्मावरून गंभीर भाष्यं केले.

अहमद शहजाद म्हणतो की, “तुम्ही मुस्लिम नसाल आणि त्यानंतर आमचा धर्म स्वीकारून मुस्लिम झालात, तर आयुष्यात काहीही करा, तुम्हाला स्वर्गात स्थान नक्कीच मिळेल.” यावर दिलशान काहीतरी त्याला उत्तर देतो, पण त्या व्हिडीओ स्पष्टपणे ऐकू येत नाही. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर शहजाद म्हणतो, “तर पुढे येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी तयार राहा.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाला आणि पाकिस्तानी खेळाडूवर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी टीका केली. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अहमद शहजादचे वक्तव्य मूर्खपणाचे असल्याचे म्हटले होते. शहजादची चौकशी केली जाईल, असे आश्वासन बोर्डाने दिले होते. मात्र, पुढे शहझादवर कारवाई झाली नाही.

हेही वाचा: ENG vs AFG, WC 2023: इंग्लंडवरील थरारक विजयानंतर रवी शास्त्रींनी अफगाणिस्तानचे केले कौतुक; म्हणाले, “विश्वचषक इतिहासात…”

दुसरीकडे, दानिश कनेरियाने नेहमीच आपल्याला नेहमीच सावत्र वागणूक मिळत असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला की, “पाकिस्तान बोर्डाने मॅच फिक्सिंग करणाऱ्या सर्व क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर कुठले ना कुठले पद बहाल केले. आज प्रत्येकाला काहीतरी काम आहे, परंतु मला मात्र त्यांनी अलगद बाजूला केले.” दानिश कनेरियावर २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता, ज्यामध्ये तो दोषी आढळला होता. यानंतर पीसीबीने त्याच्यावर बंदी घातली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This always happened to me danish kaneria made a big accusation on pakistan by sharing an old video avw