India vs New Zealand, ICC World Cup 2023: बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आणि अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दिग्गज फुटबॉलपटू तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून वानखेडे स्टेडियमवर तो सामना पाहण्यसाठी हजरी लावण्याची शक्यता आहे. व्हीव्हीआयपी गॅलरीत इतर अनेक माजी क्रिकेटपटू, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेकहॅमसाठी एक स्पेशल प्री-मॅच सेगमेंट देखील आयोजित केला जाऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेकहॅम हा युनिसेफचा सदिच्छा दूत म्हणून भारतात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने युनिसेफबरोबर भागीदारी केली आहे. अशा स्थितीत बेकहॅम सामन्यादरम्यान उपस्थित राहू शकतो. युनिसेफने महिला आणि मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि क्रिकेटच्या माध्यमातून समावेश आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीबरोबर भागीदारी केली आहे.

हेही वाचा: IND vs NZ, Semi-Final: पावसामुळे सेमीफायनल आणि फायनल रद्द झाल्यास टीम इंडियाला फायदा होणार? जाणून घ्या आयसीसीचे नियम

यजमान भारताने सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून नऊ सामन्यांची विजयी मालिका कायम ठेवली आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. त्यांचा निव्वळ रन रेट +२.५७० होता. गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिल्यानंतर भारताचा सामना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या किवी म्हणजेच न्यूझीलंडशी होणार आहे.

भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाला हरवून केली. त्यानंतर ‘मेन इन ब्लू’ने अफगाणिस्तान, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा पराभव केला. भारताने सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत आपला उत्कृष्ट विक्रम कायम राखत डच संघावर १६० धावांनी शानदार विजय मिळवून लीग टप्प्याचा समारोप केला. दुसरीकडे, न्यूझीलंडने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला पराभूत करून चौथे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली. गेल्या दशकात मोठ्या स्पर्धांमध्ये झगडणाऱ्या भारतीयांसाठी उपांत्य फेरीचा सामना ही मोठी कसोटी असेल.

हेही वाचा: IND vs NZ, Semi-Final: पावसामुळे सेमीफायनल आणि फायनल रद्द झाल्यास टीम इंडियाला फायदा होणार? जाणून घ्या आयसीसीचे नियम

‘द मेन इन ब्लू’ संघाने यंदाच्या विश्वचषकात सलग नऊ सामने जिंकले आहेत. आता १९८३ आणि २०११ नंतर तिसऱ्यांदा विश्वचषक ट्रॉफी उचलण्याचा संघाचा प्रयत्न असेल. तसेच, १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. २०१५ आणि २०१९च्या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१९च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली हा भारतीय संघ त्या पराभवाचा बदला नक्की घेईल, अशी चाहत्यांना खात्री आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This football magician david behkam can watch the india vs new zealand semi final sitting with the god of cricket know avw