Deep Dasgupta on Rohit Sharma and Virat Kohli: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय टी-२० संघात परतले आहेत. पहिला टी-२० सामना गुरुवारी ११ जानेवारीला मोहालीत खेळवला जाईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्याबद्दल दीर्घ चर्चा आणि शक्यतेनंतर, दोन्ही दिग्गजांचा अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे, जो टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये देखील त्यांचा सहभाग दर्शवतो.

दरम्यान, माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या भारताच्या टी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला परत आणण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. “२०२२च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संघाचा पराभव झाल्यानंतर कोहली आणि रोहित यांनी भारताकडून टी-२० सामने खेळलेले नाहीत. रोहित आणि विराटची निवड जुन्या परिस्थितीत जाण्यासारखी आहे,” अशी टिप्पणी दासगुप्ता यांनी केली. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना दीप म्हणाले की, “मी थोडा आश्चर्यचकित झालो कारण, मला वाटले की निवड समिती रोहित आणि कोहली यांच्यापासून पुढे गेली असून थोडा वेगळा विचार करत आहे.”

हेही वाचा: National Awards: मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार घेताना आईच्या डोळ्यात आले आनंद अश्रू; म्हणाला, “लोकांचे आयुष्य निघून…”

भारतीय संघाचे माजी सलामीवर खेळाडू दासगुप्ता पुढे म्हणाले, “मला थोडे आश्चर्य वाटले कारण संघ व्यवस्थापन रोहित आणि कोहली यांच्या व्यतिरिक्त विचारच करत नाहीये. गेल्या टी-२० विश्वचषकात सीनियर खेळाडूंनी खराब कामगिरी केली होती, हा त्यावेळी मुख्य मुद्दा होता. पण मग, तुम्हाला वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यांचा प्रकार विचारात घेणे आवश्यक आहे, तुम्ही हाय-स्कोअरिंग सामन्यांची किंवा अधिक सन्मानजनक धावांची अपेक्षा करत आहात?” ते पुढे म्हणाले, “प्रामाणिकपणे जर सांगायचे तर, गेल्या वर्षभरात मला भारतासाठी कोणतीही स्पष्ट दिशा दिसत नाही. जर त्यांना कोहली आणि रोहितकडे परत जायचे असेल, तर गेल्या वर्षी आमच्याकडे असलेल्या युवा संघांकडे पाहता, ते पुन्हा मागचीच रणनीती पुढे वापरत असून युवा खेळाडूंना डावलत आहे. मला निवड समितीचे धोरण काय आहे हेच कळत नाहीये. जर वरिष्ठ खेळाडूंबरोबर जायचे झाल्यास पुन्हा शून्यातून सर्व सुरू करावे लागेल. यामुळे भारतीय क्रिकेटचे खूप नुकसान होऊ शकते.”

रोहित शर्मा प्रदीर्घ कालावधीनंतर टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार!

यावर्षी, टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा आयपीएलनंतर म्हणजेच १ जूनपासून सुरू होईल. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाकडे फक्त एक टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका शिल्लक आहे. ही मालिका याच महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध खेळवली जाणार आहे. ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा टी-२० संघ आज (७ जानेवारी) जाहीर केला. या मालिकेतून रोहित शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार, असे मानले जात आहे.

हेही वाचा: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यातील ‘राम सिया राम’ भजनावर केशव महाराजाने दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया; पाहा Video

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव, आवेश खान, मुकेश कुमार.

Story img Loader