पहिल्या सामन्यात आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, पण त्यामधून आम्ही बरेच काही शिकलो आहोत. या सामन्यातील पहिल्या डावातील आघाडी निर्णायक ठरेल. हा आमच्यासाठी नवीन सामना असून आमच्या संघाचे या सामन्याने भवितव्य बदलेल, असे सकारात्मक उद्गार इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक याने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये काढले.तो पुढे म्हणाला की, संघात गुणवान खेळाडू आहेत, पण त्यांना अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
परंतु मला विश्वास आहे की, या सामन्यात खेळाडूंकडून चांगली कामगिरी होईल. गेल्या दौऱ्यात या मैदानावर आम्ही सामना जिंकला होता, त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
हा सामना संघाचे भवितव्य बदलेल – र्कुक
पहिल्या सामन्यात आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, पण त्यामधून आम्ही बरेच काही शिकलो आहोत. या सामन्यातील पहिल्या डावातील आघाडी निर्णायक ठरेल. हा आमच्यासाठी नवीन सामना असून आमच्या संघाचे या सामन्याने भवितव्य बदलेल,

First published on: 23-11-2012 at 04:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This match decide or change the team feature says cook