Mohammad Kaif appeal fans to support team India for WC 2023: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तिथे टीम इंडियाने कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली. पण टी२० सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. वेस्ट इंडिजने सुरुवातीच्या दोन्ही  सामन्यात भारताचा पराभव करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर भारतीय चाहते निराश झाले आहेत आणि सोशल मीडियावर आपला राग काढत आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर मोहम्मद कैफने चाहत्यांना खास आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद कैफने चाहत्यांमध्ये एकता नसल्याचा केला आरोप 

मोहम्मद कैफने ट्वीट करून चाहत्यांमध्ये एकता नसल्याचा आरोप केला. तसेच संघाला पाठिंबा देण्याविषयी आवाहन करताना म्हणतो की, “टीम इंडियाविरुद्ध काहीही वाईट बोलू अथवा लिहू नका. टीम इंडियाला पाठिंबा देताना एकता दाखवा आणि आवडीचे खेळाडू वाटून घेण्यापेक्षा संपूर्ण संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा. रोहित आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सारख्या मोठ्या खेळाडूंशिवाय स्पर्धेत खेळले आहेत. यावेळी विश्वचषक मायदेशात येत आहे. खेळाडूंना तुमच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. त्यामुळे टीका करण्यापेक्षा त्यांच्यावर विश्वास दाखवा.”

हेही वाचा: Rohit Sharma: विश्वचषक ट्रॉफी हातात घेत रोहित शर्माने इतर संघांना दिला इशारा; म्हणाला, “१२ वर्षांनंतर पुन्हा आलो आहोत…”

चाहते भारतीय खेळाडूंवर का टीका करत आहेत?

वास्तविक, पुढील २ महिन्यांनंतर भारताला घरच्या मैदानावर विश्वचषक खेळायचा आहे. मात्र त्याआधी खेळाडूंचा फॉर्म चिंतेचा विषय राहिला आहे. टी२० नंतर एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरू शकलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने सलग २ सामने गमावले आहेत. त्यामुळे चाहते संतप्त झाले असून खेळाडूंवर टीका करत आहेत.

हेही वाचा: Ishan Kishan: वेस्ट इंडिजच्या कर्णधाराची विकेट मिळवण्यासाठी इशान किशनने दाखवला स्मार्टनेस अन्…; पाहा Video

दुखापतीशी झुंजत असलेली टीम इंडिया

एकदिवसीय विश्वचषक तोंडावर आला असून टीम इंडिया दुखापतींशी झुंज देत आहे. यष्टिरक्षक फलंदाज के.एल. राहुल, स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह बराच काळ मैदानापासून दूर होते आणि आता आशिया चषक आणि विश्वचषकाच्या दरम्यान संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. विश्वचषक पाहता या खेळाडूंची टीम इंडियाला नितांत गरज आहे, कारण मधल्या फळीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर ज्या खेळाडूंना संधी देण्यात आली होती ते अपेक्षेप्रमाणे खेळू शकले नाहीत.

सध्याच्या टी२० मालिकेची स्थिती

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत टीम इंडियाने आतापर्यंत निराशा केली आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताला काही चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही. पहिल्या टी२० मध्ये वेस्ट इंडिजने आम्हाला ४ धावांनी पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात २ विकेटने भारतावर विजय मिळवला. भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This years world cup will be held in india and mohammad kaif has made a special appeal to the fans to support team india avw
Show comments