पुरुष संघाची सोप्या गटात वर्णी
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन वेळापत्रकाचा अविभाज्य घटक असलेल्या थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, महिलांसमोर खडतर आव्हान आहे, तर पुरुष गटाला सोपे वेळापत्रक असल्याने आगेकूच करण्याची संधी आहे.
महिला संघाला गटवार लढतींमध्ये बलाढय़ जपानचा सामना करावा लागणार आहे. या बरोबरीने ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीचे आव्हानही सामोरे असणार आहे. दुसरीकडे पुरुष संघाला गटवार लढतीत तुलनेने सोप्या लढतींना सामोरे जावे लागणार आहे. भारतीय पुरुषांच्या गटात इंडोनेशिया, थायलंड आणि हाँगकाँग हे संघ असणार आहेत. १५ ते २२ मे या कालावधीत कुनशान, चीन येथे ही स्पर्धा रंगणार आहे. जागतिक क्रमवारीतील स्थानाद्वारे सोळा संघांची या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
थॉमस चषक (पुरुषांसाठी)
गट अ : चीन, जपान, फ्रान्स, मेक्सिको
गट ब : इंडोनेशिया, भारत, थायलंड, हाँगकाँग
गट क : कोरिया, मलेशिया, इंग्लंड, जर्मनी
गट ड : डेन्मार्क, तेपैई, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका
उबेर चषक (महिलांसाठी)
गट अ : चीन, डेन्मार्क, स्पेन, मलेशिया
गट ब : कोरिया, तैपेई, मॉरिशस, अमेरिका
गट क : थायलंड, इंडोनेशिया, बल्गेरिया, हाँगकाँग
गट ड : जपान, भारत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा