Basit Ali on BCCI and ICC: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे आणि सध्या हा जोरदार चर्चेत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) भारताच्या वर्चस्वाबद्दल मोठे विधान केले आहे. पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने बीसीसीआयवर टीका केली आहे आणि आरोप केला की आयसीसीमध्ये भारताचा प्रभाव इतका आहे की ते त्यांना हवे ते करू शकतात आणि इतर आयसीसी सदस्य देशांच्या मताकडे दुर्लक्ष करतात.

हेही वाचा – IND vs SL: टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, नव्या कर्णधाराची केली घोषणा; अनुभवी खेळाडूला डच्चू

PAK vs BAN Test Ahmad Shahzad mocking on Pakistan team
PAK vs BAN Test Series : लाजिरवाण्या पराभवानंतर अहमद शहजादने पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बांगलादेशने तुम्हाला तुमच्याच…’
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
Kamran Akmal big statement on Virat Kohli and Rohit Sharma
Kamran Akmal : कोहली-रोहितबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जास्त तर…”
PAK vs BAN Ahmad Shahzad Slams PCB For Pakistan Defeat Against Bangladesh
PAK vs BAN: “माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCBला सुनावलं
Ramiz Raja on PAK vs BAN Test
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘आशिया कपमध्येच भारताने पाकिस्तानची…’
Umpire Anil Chaudhary Statement on Pakistan Mohammed Rizwan Appeals in Matches
VIDEO: “कबुतरासारखा उड्या मारत असतो…” पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारतीय अंपायरचं मोठं विधान, सर्व विकेटकिपर्सनाही दिली सक्त ताकीद
arshad nadeem pakistan
Arshad Nadeem: “भारताचे षडयंत्र…”; अर्शद नदीमच्या विजयानंतर पाकिस्तानच्या ॲथलेटिक्स महासंघाचा आरोप

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये म्हणजेच पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. दोन्ही देशांमधील खराब राजकीय संबंधांमुळे बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी स्पर्धेसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्याची शक्यता फार कमी आहे. तर बीसीसीआयने आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

हेही वाचा – Rahul Dravid: पुन्हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार राहुल द्रविड? KKR नव्हे तर ‘या’ संघासह IPL मध्ये करणार पुनरागमन

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूची BCCI वर टीका

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरून सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, पाकिस्तानचे दिग्गज बासित अली यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बीसीसीआयवर टीका केली. बसित म्हणाले, “५-६ क्रिकेट बोर्ड जय शाह जसं म्हणतील तसे करतील. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना लॉलीपॉप दिला आहे. मुळात, त्यांना (इतर मंडळांनी) सांगितले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (पाकिस्तान) भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळली पाहिजे, मग ती ऑस्ट्रेलियामध्ये असो की इंग्लंडमध्ये, ते (इतर बोर्ड) भारताला पटवून देतील.”

हेही वाचा – IND vs SL: भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले आहेत तरी कोण? देशांतर्गत क्रिकेटमधील आकडे वाचून व्हाल चकित

बासित यांनी आपल्या वक्तव्यात असेही म्हटले आहे की बीसीसीआयकडे पैसे आहेत त्यामुळे प्रत्येक बोर्ड त्यांच्या बाजूने बोलण्यास तयार आहे. “जय शाह म्हणाले, चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार तर पाकिस्तानमध्ये होईल, जय शाह म्हणाले हायब्रिड मॉडेल असेल तर सगळे तेच म्हणतील. कारण इतर बोर्डांचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी येतात ना, तेव्हा बीसीसीआय त्यांना मोठी रक्कम देते, मग तो इंग्लिश क्रिकेट बोर्ड असो, न्यूझीलंड बोर्ड असो ला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड असो वा ऑस्ट्रेलियन बोर्ड असो. बीसीसीआयकडे जितका पैसा आहे तितका कोणत्याच बोर्डाकडे पैसा नाही, यात काही शंका नाही,” असे बासित म्हणाले.

पाकिस्तानने आयसीसीला सादर केलेल्या ड्राफ्ट वेळापत्रकानुसार, पाकिस्तानने लाहोरमध्ये भारताचे सर्व सामने आयोजित केले आहेत. तथापि, भारताने या पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यास अधिकृत विधान आल्यानंतर वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे.