जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान गमावण्याची भीती खेळावर जाणवू लागली आहे, याचा नोव्हाक जोकोव्हिचने साफ शब्दांत इन्कार केला. जोकोव्हिचने चीन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली तरी स्पेनच्या राफेल नदालने त्याचे अव्वल स्थान धोक्यात आणले आहे. नदालने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यास, तो अव्वल स्थानावर विराजमान होईल.
जोकोव्हिचने तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात फर्नाडो वेर्डास्कोवर विजय मिळवून आगेकूच केली. तो म्हणाला, ‘‘दुसरा सेट जिंकण्याची संधी मला होती, पण मी वेर्डास्कोला सामन्यात पुनरागमन करून दिले. क्रमवारीत बदल होत असतत. वर्षांनुवर्षे ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे त्याचा फारसा विचार करणे योग्य नाही. जास्तीत जास्त सामने जिंकणे, हेच माझे ध्येय आहे. तसे होत गेल्यास, मी पुन्हा अव्वल स्थानी पोहोचू शकतो. राफेल नदाल अव्वल स्थानी पोहोचणार असल्यामुळे मी फारसा विचलित झालो नाही. सामने जिंकण्याकडे मी लक्ष केंद्रित केले आहे. माझे खेळावरचे लक्ष विचलित झाले आहे, असे काहींचे म्हणणे आहे, पण ते साफ चुकीचे आहे.’’

Story img Loader