क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन सट्टेबाजांना साबरमती पोलिसांनी अटक केली. अनिल कुमार, उत्तम चंद आणि हर्षद रमेश, अशी या तिघांची नावे आहेत.
साबरमतीमधील कालिगाम विभागात रामजी मंदिराजवळ आम्ही तीन सट्टेबाजांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १६,७८० रुपयांची रोकड, एक लॅपटॉप, सात मोबाइल फोन्स आणि दूरचित्रवाणी संच जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी व्ही. आर. पटेल यांनी दिली. या तिघांमधील दोघे साबरमतीचे रहिवासी असून तिसरा या दोघांचा मित्र आहे. मंदिरातील एका रूममध्ये बसून हे तिघे सट्टा लावत होते.
शनिवारी सट्टेबाज विनोद मूलचंदानीला अटक करण्यात आली होती आणि त्याच्याकडून १.५४ कोटी रुपये जप्त केले होते.

Story img Loader