युएईत १७ ऑक्टोबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत टी २० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान संघानं मोर्चेबांधणी केली आहे. पाकिस्तानचा संघ ग्रुप २ मध्ये असून २४ ऑक्टोबरला भारताविरुद्ध सामना आहे. त्यामुळे पाकिस्ताननं आपल्या संघात तीन बदल केले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. संघात हैदर अली, सरफराज अहमद आणि फखर जमानला सहभागी केलं आहे. ४ सप्टेंबरला घोषित केलेल्या संघात पाकिस्तान लीगमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर बदल करण्यात आला आहे.
सरफराज अहमद आणि हैदर अली यांनी आझम खान आणि मोहम्मद हसनैन यांची जागा घेतली आहे. तर फखर जमानला राखीव खेळाडू म्हणून सहभागी केलं आहे. त्याला खुशदिल शाहच्या जागेवर घेण्यात आलं आहे.
टी २०साठी पाकिस्तानचा संघ
बाबर आझम, शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, सरफराज अहमद, शाहीन शाह अफरीदी, सोहैब मकसूद