Australia U19 Women’s Squad Three Indian Origin Players: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध १९ वर्षांखालील महिलांच्या तिरंगी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली. ही मालिका १९ सप्टेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे. ब्रिस्बेन आणि गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी युवा निवड समितीने प्रत्येक फॉरमॅटसाठी (टी-२० आणि वनडे) १५ खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघामध्ये भारतीय वंशाच्या तीन महिला खेळाडूंचा समावेश आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra: नीरज चोप्राची डायमंड लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी, ऑलिम्पिकचा रेकॉर्ड मोडत केला बेस्ट थ्रो; पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू क्रिस्टन बीम्सला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. १४ दिवसांच्या या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलिया चार टी-२० आणि दोन एकदिवसीय सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात भारतीय वंशाच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे: रिबिया सायन, समारा दुल्विन आणि हसरत गिल अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “त्यांच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील वाढती विविधता आणि भारतीय वंशाच्या खेळाडूंच्या महत्त्वाचे योगदान दिसून येते.”

हेही वाचा – Cristiano Ronaldo: फुटबॉलनंतर आता युट्युबवरही रोनाल्डोचा खास विक्रम, अवघ्या ९० मिनिटांत मिळवलं गोल्डन बटण

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात ३ ‘भारतीय’ खेळाडूंना स्थान

भारतीय वंशाची खेळाडू रिबिया सायन ही व्हिक्टोरियाची वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. तर, समारा डल्विन ही एक फलंदाज आहे जी यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळली आहे. त्याचबरोबर हसरत गिलचाही गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. हसरत गिलने इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या १९ वर्षांखालील सामन्यांमध्येही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: ना बुमराह, ना कोहली, रोहितच्या मते ‘हे’ ३ दिग्गज टीम इंडियाचे आधारस्तंभ, T20 WC विजयाचं श्रेय देत म्हणाला…

ऑस्ट्रेलिया अंडर-१९ (महिला) त्रिकोणी मालिकेसाठी संघ जाहीर

टी-२० क्रिकेट संघ:
बोनी बेरी, काओम ब्रे, एला ब्रिस्को, मॅगी क्लार्क, समारा डल्विन, लुसी फिन, हसरत गिल, लुसी हॅमिल्टन, एमी हंटर, एलेनॉर लारोसा, इनेस मॅककिन, रिबिया सायन, टेगन विल्यमसन, एलिझाबेथ वर्थले आणि हेले जेउच

ऑस्ट्रेलियन अंडर-१९ महिलांचा एकदिवसीय संघ
बोनी बेरी, काओम ब्रे, एला ब्रिस्को, मॅगी क्लार्क, समारा डल्विन, लुसी फिन, हसरत गिल, एमी हंटर, एलेनॉर लारोसा, इनेस मॅकिओन, ज्युलिएट मॉर्टन (NSW), रिबिया सायन, टेगन विल्यमसन, एलिझाबेथ वर्थले, हेली जेउच.

टी-२० तिरंगी मालिका
१९ सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – ॲलन पेटीग्रू ओव्हल – दुपारी १.३० वाजता
२० सप्टेंबर – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका – ॲलन पेटीग्रेव ओव्हल – दुपारी १.३० वाजता
२२ सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – इयान हीली ओव्हल – संध्याकाळी ६.०० वाजता
२४ सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – बिल पिपेन ओव्हल (GC) – दुपारी १.३० वाजता
२५ सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – बिल पिपेन ओव्हल (GC) – दुपारी १.३० वाजता
२६ सप्टेंबर – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका – बिल पिपेन ओव्हल (GC) – दुपारी १.३० वाजता

एकदिवसीय सामन्यांची तिरंगी मालिका
३० सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – ॲलन पेटीग्रेव ओव्हल – सकाळी ९.३० वाजता
१ ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका – ॲलन पेटीग्रू ओव्हल – सकाळी ९.३० वाजता
२ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – इयान हीली ओव्हल – दुपारी २:३० वाजता