आयपीएल स्पर्धा ही युवा खेळाडूंसाठी पर्वणीच असते. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याची एक नामी संधी असते. २००८ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपलं नशीब आजमावलं. त्यात काहींना यश मिळालं, काहींच्या पदरी निराशा आली. आयपीएलमध्ये काही युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीची छाप पाडली. अगदी कमी वयात हजार धावांचा टप्पा तीन खेळाडूंनी गाठला आहे. सर्वात कमी वयाच्या तीन खेळाडूंनी ही किमया साधली आहे. यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश आहे.

ऋषभ पंत
आयपीएल स्पर्धेत दिल्लीचं कर्णधारपद भूषवण्याऱ्या ऋषभ पंत याचं नाव या यादीत आघाडीवर येतं. ऋषभ त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. त्याने आयपीएल कारकिर्दीत महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. ऋषभ पंतने आयपीएल २०१८मध्ये हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तेव्हा त्याचं वय २० वर्षे २१८ दिवस इतकं होतं.

अमित मिश्राकडून मैदानात चूक; पंचांनी गोलंदाजी रोखली!

पृथ्वी शॉ
या यादीत पृथ्वी शॉ दुसऱ्या क्रमांकावर येतो. तो २१ वर्षे १६९ दिवसांचा असताना त्याने आयपीएलमध्ये हजार धावांचा पल्ला गाठला आहे. २०१८ मध्ये आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केलेल्या पृथ्वी शॉने बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात २१ धावा केल्या आणि हजार धावांचा पल्ला गाठला. पृथ्वी शॉचं फलंदाजीतील कसब बघून त्याला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.

IPL 2021: राजस्थान रॉयल्सला मिळाला नवा परदेशी फिरकीपटू!

संजू सॅमसन
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आक्रमक खेळीमुळे त्याने या आयपीएल स्पर्धेत शतक ठोकलं आहे. त्यामुळे संजू जिथपर्यंत मैदानात आहे तिथपर्यंत प्रतिस्पर्धी संघांना विजयाची खात्री नसते. संजूने २१ वर्षे १८३ दिवसात हजार धावा पूर्ण केल्या आहेत.