ICC T20 Rankings Tilak Varma Surpasses Suryakumar Yadav And Claims 3rd Spot: आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत संजू सॅमसन आणि तिलक वर्माने मोठी झेप घेतली आहे. तिलक वर्माने तर तब्बल ६९ खेळाडूंना मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार सूर्यकुमार यादवलाही मागे टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर ICC ने जाहीर केलेल्या नवीन T20 क्रमवारीत मोठे बदल दिसत आहेत. मात्र, ट्रॅव्हिस हेडचे अव्वल स्थान अजूनही अबाधित आहे. ट्रॅव्हिस हेड ICC T20 क्रमवारीत ८५५ च्या रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याचे रेटिंग सध्या ८२८ वर आहे. तर भारताच्या तिलक वर्माने सर्वात मोठा पराक्रम करत तिसरे स्थान गाठले आहे.

हेही वाचा – Champions Trophy: “BCCI नव्हे, भाजपा…”, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला न येण्यावरून शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य

तिलक वर्माने एका झटक्यात ६९ स्थानांनी मोठी झेप घेतली आहे. तो आता सूर्यकुमार यादवला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता ८०६ गुणां पर्यंत वाढले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने लागोपाठ दोन शतकं झळकावली आहेत. याचा थेट फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला आहे.. दरम्यान, सूर्यकुमार यादवचे मात्र नुकसान झाले आहे. तो आता ७८८ रेटिंगसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – ICC Ranking: हार्दिक पंड्या ‘नंबर वन’ टी-२० अष्टपैलू खेळाडू, ICC क्रमवारीत पहिलं स्थान मिळवत घडवला इतिहास

आयसीसी टी-२० क्रमवारीत तिलक वर्माची मुसंडी

तिलक वर्माने उत्कृष्ट कामगिरी करत टॉप-१० मधील इतर अनेक फलंदाजांना मागे टाकले आहे आहे. बाबर आझमला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो आता ७४२ च्या रेटिंगसह ५व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान ७१९ च्या रेटिंगसह ६व्या स्थानावर पोहोचला आहे, त्याला देखील एक स्थान गमावले आहे.

संजू सॅमसननेही घेतली आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

संजू सॅमसनने यावेळी टी-२० क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याने १७ स्थानांची झेप घेत थेट २२वे स्थान पटकावले आहे. सध्या त्याचे रेटिंग ५९८ आहे, जे तो प्रथमच गाठण्यात यशस्वी झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात संजू सॅमसनने शानदार १०७ धावा केल्या होत्या. यानंतर तो दोनदा खाते न उघडताच बाद झाला. मात्र मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने पुन्हा १०९ धावांची नाबाद खेळी खेळली. आता संजू सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळ संघाकडून खेळताना दिसणार आहे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tilak varma at 3rd spot in icc t20i batting rankings overtakes suryakumar yadav to become indias highest ranked t20i batter in bdg