नवी दिल्ली : युवा फलंदाज तिलक वर्मावर विश्वास दाखवून निवड समितीने त्याला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्याबाबत विचार केला पाहिजे. चौथ्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज असणे भारतासाठी फायदेशीर ठरेल, असे मत रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्ससाठी गेल्या दोन हंगामांत केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिलकला भारताच्या ट्वेन्टी-२० संघात संधी मिळाली आणि त्याने सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत या संधीचे सोने केले आहे. तिलकने पहिल्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांत अनुक्रमे ३९, ५० आणि नाबाद ४९ धावा केल्या आहेत. ‘‘विश्वचषकासाठी संघनिवड करताना मधल्या फळीतील स्थानांसाठी बरीच स्पर्धा आहे. मात्र, सध्या कोणताही फलंदाज या स्पर्धेत आघाडीवर दिसत नाही. निवड समितीने तिलकबाबतही विचार करणे गरजेचे आहे. संजू सॅमसनने एकदिवसीय सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, तिलकची जमेची बाजू म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे. भारताच्या अव्वल सात फलंदाजांपैकी केवळ रवींद्र जडेजा डावखुरा आहे. त्यामुळे भारतीय संघाला आघाडीच्या फळीत डावखुऱ्या फलंदाजांची कमी जाणवत आहे,’’ असे अश्विन म्हणाला.