Tilak Varma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चार सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशी जिंकली. या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताकडून युवा फलंदाज तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने नाबाद शतकं झळकावली, ज्याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८३ धावांचा पर्वत उभारला. प्रत्युत्तरात यजमान संघ १८.२ षटकांत १४८ धावांवर गारद झाला. विशेष म्हणजे तिलक वर्माने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत दक्षिण आफ्रिकेच्या संस्मरणीय कामगिरी केली. त्याने ४७ चेंडूंत ९ चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर नाबाद १२० धावांची खेळी साकारली. यानंतर त्या आकाशाकडे बोट का दाखवले? जाणून घेऊया.
तिलक वर्माने जोहान्सबर्गमध्ये शतक झळकावल्यानंतर खास पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्याने शतक झळकावल्यानंतर आकाशाकडे बोट दाखवले. या इशाराचे रहस्य आता त्याने उलगडले आहे. २२ वर्षीय तिलकने तिसऱ्या सामन्यात ५६ चेंडूत नाबाद १०७ धावा केल्या होत्या. यानंतर चौथ्या सामन्यातही शतक झळकावत त्याने मोठा पराक्रम केला आहे. तो सलग दोन टी-२० सामन्यांमध्ये शतकं झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या खेळीच्या जोरावर त्याने प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कारही जिंकला आहे. त्याने या मालिकेत सर्वाधिक २८० धावा केल्या. यासह त्याने एक मोठा विक्रम केला आहे.
प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सीरीजचा मानकरी –
तिलक वर्माने प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकून विक्रम केला आहे. पुरुषांच्या टी-२० मालिकेत दोन्ही पुरस्कार जिंकणारा तो सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. पुरस्कार जिंकल्यानंतर तो म्हणाला, “मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो, गेल्या वर्षी जेव्हा मी येथे खेळायला आलो होतो, तेव्हा पहिल्याच चेंडूवर बाद झालो होतो. मात्र, आज ही खेळी संघाला मालिका जिंकण्यासाठी खूप महत्त्वाची होती. मी फक्त मूलभूत गोष्टींचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करीत होतो. जसे मी गेल्या सामन्यात केले होते. मी शांत होतो. सलग दोन शतके, एक अविश्वसनीय भावना आहे. मी आत्ता ते व्यक्त करू शकत नाही.”
u
u
u
‘माझा देवावर आणि माझ्या प्रक्रियेवर विश्वास’ –
तिलक पुढे म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेतील आव्हानात्मक परिस्थितीत दोन शतके झळकावण्याची मी कल्पनाही केली नव्हती. यासाठी कर्णधार सूर्याचे आभार. गेल्या काही महिन्यांत मी जखमी झालो होतो. माझा देव आणि माझ्या प्रक्रियेवर विश्वास आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मी माझे शतक पूर्ण झाले, मी फक्त देवाकडे बोट दाखवले आणि त्याचे आभार मानले.” २२ वर्षीय तिलकने जोहान्सबर्गमध्ये संजू सॅमसन (५६ चेंडूत नाबाद १०९) सोबत दुसऱ्या विकेटसाठी २१० धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. भारतासाठी या फॉरमॅटमध्ये कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. ज्यामुळे भारताने या सामन्यात १३५ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका खिशात घातली.