IND vs ENG 2nd T20I Highlights in Marathi: तिलक वर्माच्या विजयी चौकारासह भारताने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. भारताला विजयासाठी १६६ धावांचं आव्हान मिळालं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून तिलक वर्माने महत्त्वपूर्ण ७२ धावांची नाबाद खेळी केली. एका टोकाकडून जिथे सातत्याने विकेट पडत होते तिथे तिलकने दुसऱ्या टोकाकडून पाय घट्ट रोवत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या खेळीच्या जोरावर तिलकने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये मोठा विक्रम आपल्या नावे केला.

दक्षिण आफ्रिकेत सलग दोन शतकं झळकावल्यानंतर तिलक वर्मा टी-२० क्रिकेटमध्ये एकमागून एक उत्कृष्ट खेळी करत आहे. तिलक वर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या ४ डावांमध्ये एकदाही बाद झालेला नाही. त्याने नाबाद राहत १०७, १२० आणि १९* आणि ७२* धावांची खेळी केली. अशाप्रकारे त्याने आत्तापर्यंत नाबाद राहत एकूण ३१८ धावा केल्या आहेत.

Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
India Beat England by 2 Wickets Tilak Varma Fifty Ravi Bishnoi Washington Sundar
IND vs ENG: भारताचा विजयी ‘तिलक’, नाट्यमय लढतीत इंग्लंडवर केली मात; बिश्नोईची साथ ठरली निर्णायक
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
Shubman Gill Throws Bat in Anger After Controversial Dismissal in Ranji Trophy
Ranji Trophy: शुबमन गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर संतापला, हवेत फेकली बॅट अन् डोक्याला…, VIDEO व्हायरल
Padma Awards 2025 R Ashwin Honoured with Padma Shri Padma Bhushan for PR Sreejesh
Padma Awards 2025: आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार, पीआर श्रीजेशला पद्मविभूषण जाहीर; पाहा संपूर्ण भारतीय खेळाडूंची यादी

T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पूर्ण सदस्य संघातील खेळाडू म्हणून हा आकडा गाठणारा तिलक हा पहिला खेळाडू ठरला आहे. या बाबतीत तिलकने न्यूझीलंडचा खेळाडू मार्क चॅपमनचा विक्रम मोडला आहे, ज्यात तो चार डावात २७१ धावा करून बाद झाला होता. याशिवाय या यादीत एरॉन फिंचचे नावही आहे, ज्याने दोन डावात एकूण २४० धावा केल्यानंतर तो बाद झाला होता.

तिलक वर्माने इंग्लंड विरुद्ध ५५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिलक वर्मा शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला आणि भारताला ४ चेंडू शिल्लक असताना २ विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला. तिलकच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने खाली वाकून त्याला सलाम केला.

तिलक वर्माने इंग्लंड विरुद्ध ५५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिलक वर्मा शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला आणि भारताला ४ चेंडू शिल्लक असताना २ विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला. तिलकच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने खाली वाकून त्याला सलाम केला.

T20I मध्ये नाबाद राहत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (पूर्ण सदस्य संघ)

३१८* तिलक वर्मा (१०७, १२०, १९, ७२)
२७१ मार्क चॅपमन (६५, १६, ७१, १०४, १५)
२४० एरोन फिंच (६८, १७२) २४० श्रेयस अय्यर (५७, ७४, ७३, ३६)
२३९ डेव्हिड वॉर्नर (१००, ६०, ५७, २, २०)


Story img Loader