Tilak Verma equals Suryakumar Yadav’s record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना टीम इंडियाने ७ गडी राखून जिंकला. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सुरुवातीपासून वेस्ट इंडिज मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवने ८३ तर तिलक वर्माने ४९ धावांची नाबाद खेळी केली. तिलक वर्मा या मालिकेत शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर एक मोठा पराक्रम केला आहे.
तिलक वर्माने तिसऱ्या टी-२० सामन्यात ३७ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांमध्ये ३९, ५१ आणि ४९* धावा केल्या आहेत. यानंतर, तो भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या तीन डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गौतम गंभीरला मागे टाकले आहे. त्याचबरोबर संयुक्तपणे सूर्यकुमार यादवची बरोबरी करत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. दीपक हुडा १७२ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
सूर्यकुमार यादवनंतर तिलक वर्मा हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. ज्याने त्याच्या पहिल्या तीन डावातील प्रत्येक डावात 30 प्लस धावा केल्या आहेत. सूर्यानेही कारकिर्दीतील पहिल्या तीन डावात १३९ धावा केल्या आहेत.
पहिल्या तीन डावात भारतासाठी सर्वाधिक T20I धावा करणारे फलंदाज –
१७२ धावा – दीपक हुडा
१३९ धावा – सूर्यकुमार यादव/तिलक वर्मा
१०९ धावा – गौतम गंभीर</p>
सामन्याबद्दल बोलायचे, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा करून सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने ४२(४२) आणि रोव्हमन पॉवेलने ४०(१९) धावा केल्या. त्याच वेळी, अल्झारी जोसेफने गोलंदाजीत दोन बळी घेतले. त्याचवेळी भारताकडून प्रथम कुलदीप यादवने तीन बळी घेतले, त्यानंतर सूर्यकुमार यादवने ८३(४४) आणि तिलक वर्माने नाबाद ४९(३७) धावा करत संघाला विजय मिळवून दिला.