Tilak verma eighth highest run scorer on debut: टीम इंडियाला टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताकडून तिलक वर्माने आणि मुकेश कुमारने पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यात तिलक वर्माने शानदार खेळी केली. त्याने आणि ३९ धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर तो टीम इंडियाच्या एका खास क्बमध्ये सामील झाला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात तिलक वर्माने २२ चेडूंचा सामना करताना ३ षटकार आणि २ चौकारांच्या जोरावर ३९ धावा केल्या. या शानदा खेळीमुळे त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. पदार्पणाच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तिलक आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Axar Patel Stunning Catch of David Miller Reminds South Africa T20 World Cup 2024 Suryakumar Yadav IND vs SA 3rd T20I Watch Video
Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी

पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने षटकार मारत चाहत्यांना खूश केले. तिलक वर्मा बराच काळ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. भारतीय संघासाठी पदार्पणाच्या टी-२० सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजिंक्य रहाणेच्या नावावर आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यात ६१ धावांची खेळी साकारली होती. सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५७ धावा केल्या होत्या. इशान किशन ५६ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर आता या यादीत ३९ धावांसह तिलक वर्मा आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हेही वाचा – IND vs WI 1st T20: राष्ट्रगीत सुरू असताना हार्दिक पांड्या झाला भावूक, डोळ्यातील अश्रू पुसतानाचा फोटो व्हायरल

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. यजमान वेस्ट इंडिजने भारताला रोमहर्षक सामन्यात चार धावांनी पराभूत केले. विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या संघाने २० षटकांत ६ बाद १४९ धावा केल्या. अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांनी चांगली गोलंदाजी केली. अर्शदीपने ४ षटकात ३१ धावा देत २ बळी घेतले. चहलने ३ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले. कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा – Deodhar Trophy 2023: दक्षिण विभागाने २१ वर्षांनी देवधर ट्रॉफीवर कोरले नाव, ४५ धावांनी उडवला पूर्व विभागाचा धुव्वा

प्रत्युत्तरात टीम इंडियाला १५० धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि २० षटकात ९ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. कर्णधार हार्दिक पांड्या १९ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने २१ धावा केल्या. इशान किशन ६ धावा करून बाद झाला. संजू सॅमसन १२ धावांवर बाद झाला. आता वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.