IND vs BAN, Asia Cup 2023: आज आशिया चषक २०२३चा शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. १७ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्माने बांगलादेशविरुद्ध आशिया कप २०२३ सुपर-४च्या शेवटच्या सामन्यात पदार्पण केले आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने आपल्या प्लेइंग-११ मध्ये ५ बदल केले आहेत. दुसरीकडे, तिलक वर्माला भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. याआधी त्याने टी२० मध्ये पदार्पण केले होते आणि त्यात चांगली कामगिरी केली होती.
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहितने प्लेइंग-११ मध्ये पाच बदल केले आहेत. विश्वचषक आणि खेळाडूंवर कामाचा ताण आणि दुखापतीची भीती लक्षात घेऊन रोहितने हा निर्णय घेतला. फायनलपूर्वी हिटमॅनला आपल्या खेळाडूंना ताजेतवाने ठेवायचे आहेत. आशिया चषकाचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांचा प्लेईंग-११ मध्ये प्रवेश झाला आहे.
तिलक वर्मा पदार्पण करत आहेत
रोहित शर्माने एकदिवसीय कॅप तिलक वर्मा यांच्याकडे सोपवली. तो वन डेमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत, डावखुरा फलंदाज तिलकने पाच सामन्यात ५७.६७च्या सरासरीने आणि १४०.६५च्या स्ट्राइक रेटने १७३ धावा केल्या. तिलकच्या आगमनामुळे रोहित कसा मार्ग काढतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. के.एल. राहुल किंवा इशान किशन यांना विश्रांती दिली जाऊ शकते. तनझिम हसन बांगलादेशकडून वन डे पदार्पण करत आहे.
अक्षर पटेलचा फॉर्म ही चिंतेची बाब
‘थिंक टँक’साठी, अक्षर पटेलच्या गोलंदाजीचा आलेख घसरणे ही चिंतेची बाब असेल कारण, त्याचा रवींद्र जडेजाचा पर्याय म्हणून वापर केला जात आहे. हा डावखुरा फिरकीपटू विकेट घेऊ शकत नाही आणि धावगती नियंत्रित करू शकत नाही. अक्षरने या वर्षात सात एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि सहाच्या इकॉनॉमी रेटने त्याला फक्त तीन विकेट्स घेता आल्या आहेत. त्याला आपला खेळ लवकर सुधारण्याची गरज आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, तिलक वर्मा, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, प्रसीध कृष्णा, मोहम्मद शमी.
बांगलादेश: तनजीद हसन तमीम, लिटन दास (विकेटकीपर), अनामूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तन्झिद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.