Tilak Verma told Suryakumar yadav I changed my mind as soon as the first ball was hit for a four: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकल्याने मालिका आता २-१ अशी बरोबरीत आली आहे. ५ सामन्यांच्या या टी-२० मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये टीम इंडियाला सतत पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाने तिसरा सामना १३ चेंडू आणि ७ गडी राखून जिंकला. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने ८३ धावा केल्या, तर तिलक वर्माने ४९ धावांची नाबाद खेळी केली. सामन्यानंतर सूर्याने तिलकशी केलेल्या संवादात सांगितले की, तो या उद्देशाने फलंदाजीसाठी मैदानात उतरला नव्हता.
सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूत ८३ धावांची तुफानी खेळी केली आणि सामनावीराचा किताबही पटकावला. तिलकशी झालेल्या संवादात सूर्याने स्वत:साठी उल्लू हा शब्द वापरत, डाव सुरू होण्याआधी स्वत:ची फसवणूक केल्याचे सांगितले. बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या दोन्ही खेळाडूंमधील संभाषणाच्या व्हिडीओमध्ये तिलक वर्मा म्हणाली की, जेव्हा तो फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याने आरामात सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता, पण पहिल्याच चेंडूवर चौकार आल्याने त्याने आपला निर्णय बदलला आणि वेगवान फलंदाजी सुरू केली.
एक प्रश्न आणि दोन उत्तरं –
सूर्याने वरिष्ठ असल्याने वर्माला तिसऱ्या टी-२० मधील खेळीबद्दल बोलण्यास सांगितले, ज्यावर युवा तिलकने उत्तर दिले, माझ्या खेळीबद्दल बोलण्यासारखे फार काही नाही, मी दुसऱ्या बाजूने तुमच्या फलंदाजीचा आनंद घेत होतो. हे उत्तर ऐकून सूर्याला हसू येते. यानंतर सूर्या म्हणाला, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. एक प्रश्न आणि दोन उत्तरे, असे करू नको. आज तू कशी फलंदाजी केलीस ते सांग, यावर तिलक वर्माही हसू लागतो.
हेही वाचा – IND vs WI: “मला लाज वाटत नाही, कारण प्रामाणिकपणा…”; विजयानंतर सूर्यकुमार यादवचे मन जिंकणारे विधान
तिलक वर्माने तिसऱ्या टी-२० सामन्यात काय खास कामगिरी केली सांगितले –
या संभाषणात सूर्याने तिलकला तिसर्या सामन्यात त्याच्या फलंदाजीत काय विशेष आहे असे विचारले, ज्यावर त्याने उत्तर दिले की, तो फक्त त्याचे शॉट्स खेळण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यानंतर तिलकने सूर्याला लांबलचक षटकार मारण्याचे रहस्य विचारले, यावर सूर्यकुमार त्याला म्हणाला या प्रश्नाचे उत्तर ड्रेसिंग रूममध्ये देतो. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथा सामना १२ ऑगस्ट रोजी लॉडरहिल, फ्लोरिडामध्ये खेळवला जाईल.