महिलेला अश्लील फोटो आणि अश्लील संदेश पाठवण्यावरून टिम पेनचा वाद अजून संपलेला नाही. अशातच अजून एका घटनेने पेनचे संकट वाढले आहे. पेनच्या बहिणीचा पती शॅनन टब याच्यावरही तसाच आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्याच महिलेला अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप शॅननवर आहे. या ‘सेक्सटिंग’ वादामुळे क्रिकेट तस्मानियाने शॅननला बडतर्फ केले आहे. ४१ वर्षीय शॅननने तस्मानियासाठी शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धा खेळली आहे आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

हेराल्ड सनच्या अहवालानुसार, महिला सहकाऱ्याला अश्लील संदेश पाठवल्याच्या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर टिम पेनचा भावोजी शॅननने कोचिंग पद सोडले आहे. ही तीच महिला सहकारी आहे जिला पेनने २०१७ मध्ये अश्लील संदेश पाठवले होते. क्रिकेट तस्मानियाने शॅननच्या आरोपांचीही चौकशी केली. त्याचवेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पेनवरील आरोपांची चौकशीही केली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पेनला क्लीन चिट दिली होती. मात्र, चार वर्षांनंतर पेनचा अश्लील संदेश व्हायरल झाल्याने त्याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला.

हेही वाचा – नवऱ्याच्या Sexting Scandal प्रकरणानंतर बायकोनं सोडलं मौन; म्हणाली, “मी आधीच माझा…”

शॅननचे लग्न पेनच्या बहिणीशी झाले आहे. ४१ वर्षीय डावखुरा फिरकीपटू शॅनन ९०च्या दशकात तस्मानियाकडून क्रिकेट खेळला आहे. मात्र, या वादानंतर तो अॅडलेडच्या प्रिन्स अल्फ्रेड कॉलेजच्या संघाचा प्रशिक्षक बनला आहे.

पेनने शुक्रवारी होबार्टचे कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. स्टीव्ह स्मिथ बॉल टॅम्परिंगच्या वादात दोषी आढळल्यानंतर पेनला २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. पेनने कर्णधारपद सोडले असले तरी. पण अॅशेस मालिकेत तो यष्टीरक्षक म्हणून खेळताना दिसणार आहे. मात्र, या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व कोण करणार आहे. ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader