Tim Saudi Breaks Shakib Al Hasan’s Record: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील चार सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान संघ इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १३९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १४ षटकात ३ विकेट गमावत १४३ धावा करत सामना जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने एक मोठा कारनामा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थात हा सामना इंग्लंडने जिंकला, पण न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीनेही एक विकेट घेत इतिहास रचला. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने शाकिब अल हसनलाही मागे टाकत हा कारनामा केला.

टीम साऊदीने मोडला शाकिब अल हसनचा विक्रम –

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात किवी वेगवान गोलंदाज आणि कर्णधार टीम साऊदीने ३ षटकात २५ धावा देत, जॉनी बेअरस्टोच्या रूपाने एक विकेट घेतली. या एका विकेटनंतर, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या बळींची संख्या १४१ वर पोहोचली. त्यामुळे तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

हेही वाचा – सौरव गांगुलीचे टीम इंडियाबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, आशिया चषक आणि विश्वचषकासाठी ‘या’ दोन खेळाडूंवर अवलंबून

टीम साऊदीने शाकिब अल हसनला मागे टाकत दुसऱ्या स्थानी ढकलले टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४० विकेट्सची नोंद आहे. या यादीत राशिद खान १३० विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंडचा ईश सोधी ११९ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे, तर लसिथ मलिंगा १०७ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप ५ गोलंदाज –

१४१ विकेट्स – टीम साऊदी
१४० विकेट्स – शकिब अल हसन
१३० विकेट्स – राशिद खान
११९ विकेट्स – ईश सोधी
१०७ विकेट्स – लसिथ मलिंगा

हेही वाचा – IND vs PAK: विराट कोहलीच्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या खेळीचा फ्लॅशबॅक पाकिस्तानचा तणाव वाढवणार, माजी खेळाडूचं वक्तव्य

टीम साऊदीने २००७ साली न्यूझीलंडकडून पदार्पण केले, तेव्हापासून तो न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा मुख्य आधार आहे. त्याने न्यूझीलंडसाठी १११ टी-२० सामन्यांमध्ये १४१ विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये १८ धावांत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tim saudi has become the highest wicket taker in t20 international cricket vbm