ENG vs NZ 2nd Test Match Updates: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना किवी संघ हरला असून दुसऱ्या कसोटी सामन्यातही संघाची अवस्था वाईट आहे. जणू काही न्यूझीलंडचा संघ आपल्या भूमीवर खेळत नसून इंग्लंडचा संघ आपल्या भूमीवर खेळत आहे. न्यूझीलंडचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. दरम्यान, संघाचा कर्णधार आणि गोलंदाज टिम साऊथीने कसोटी सामन्यात फलंदाज म्हणून एक विक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम साऊथीने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या. यादरम्यान त्याने एमएस धोनीसारख्या दिग्गजांचा विक्रम मोडला. टीम साऊथीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत एमएस धोनी (७८), केविन पीटरसन आणि मिसबाह-उल हकसारख्या फलंदाजांना मागे टाकले आहे. आता त्याने मॅथ्यू हेडन आणि अँड्र्यू फ्लिंटॉफची बरोबरी केली आहे.

वेलिंग्टनमधील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम साऊथी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत १५व्या स्थानावर होता, मात्र पहिल्या डावानंतर तो यादीत ११व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ८२ षटकार मारले आहेत. अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि मॅथ्यू हेडन यांनी समान षटकार ठोकले आहेत. पुढच्या डावात त्याने एक षटकारही मारला तर तो पहिल्या दहाच्या यादीत सामील होईल.

हेही वाचा – Shardul Thakur Marriage: स्वत:च्या हळदी समारंभात शार्दुल ठाकूरचा झिंगाट डान्स; पाहा VIDEO

टीम साऊथीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. किवी संघाच्या फलंदाजांना दुहेरी आकडा पार करणे कठीण जात होते. याच खेळपट्टीवर साऊथीने इंग्लिश गोलंदाजीची लाईन लेंथ खराब करण्याचे काम केले. मात्र, तरीही कर्णधाराची ही झंझावाती खेळी न्यूझीलंडचा फॉलोऑन टाळू शकली नाही. या सामन्यात किवी संघाला सलग दुसऱ्यांदा फलंदाजी करावी लागली आहे.

हेही वाचा – WPL 2023: Mumbai Indians च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आगामी हंगामासाठी लाँच केली नवी जर्सी, पाहा VIDEO

शनिवारी इंग्लंडने पहिला डाव ४३५/८ धावांवर घोषित केला. जो रूटने नाबाद १५३ आणि हॅरी ब्रूकने १८६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने चार विकेट घेतल्या. त्यानंतर न्यूझीलंड संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २०९ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी ८३ षटकांच्या समाप्तीनंतर ३ बाद २०२ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडचा संघ २४ धावांनी पिछाडीवर आहे.