India vs New Zealand Test Series: न्यूझीलंड संघाचा कसोटी कर्णधार टीम साऊदीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंड संघाला आता पुढील कसोटी मालिका भारताविरूद्ध खेळायची आहे. तत्त्पूर्वी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका २-० ने गमावल्यानंतर साऊदीन किवी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. याचबरोबर नव्या कर्णधाराचीही घोषणा करण्यात आली आहे.

भारत दौऱ्यावर न्यूझीलंड संघाचा फलंदाज टॉम लॅथम ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे नेतृत्व करणार आहे. लॅथमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. लॅथमने यापूर्वी २०२० ते २०२२ दरम्यान नऊ वेळा कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे.

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

केन विल्यमसनने संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर साऊदीने २०२२ मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याने १४ कसोटीत संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी सहा सामने जिंकले, तर सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि दोन सामने अनिर्णित राहिले. न्यूझीलंड संघाला नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत मोठा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंड संघाने पहिल्या कसोटी सामन्यात कडवी झुंज दिली, पण अखेरीस त्यांना पराभव पत्करावा लागला. तर दुसऱ्या कसोटीत तर श्रीलंकेने एका डावाने विजय मिळवला.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताची मोठी झेप, अंतिम फेरीसाठी दावेदारी मजबूत

साऊदीचा फॉर्म या वर्षी चर्चेत राहिला आहे. कारण गेल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये त्याने केवळ १२ विकेट्स घेतल्या आहेत. तो श्रीलंकेत दोन्ही सामने खेळला असला तरी आगामी भारत मालिकेत तो खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर संघात संधी मिळण्यासाठी त्याला मॅट हेन्री, विल ओ’रुर्के आणि बेन सियर्स यांच्याशी स्पर्धा असेल. ओ’रुर्केने श्रीलंकेत प्रभावी कामगिरी केली होती, तर हेन्रीने मायदेशातील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली.

हेही वाचा – IND vs BAN: BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला फळं खात असताना कॅमेऱ्यात कैद, कॅमेरा आपल्याकडे असल्याचे पाहताच पाहा काय केलं?

साऊदी नव्या विक्रमाच्या जवळ

टॉम लॅथमने यापूर्वी २०२० ते २०२२ दरम्यान नऊ वेळा कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी साऊदीच्या निर्णयाचे निस्वार्थीपणे कौतुक केले. साऊदीला ४०० विकेट्स घेणारा दुसरा न्यूझीलंडचा गोलंदाज बनण्यासाठी १८ विकेट्सची आवश्यकता आहे. भारताच्या तीन कसोटी सामन्यांच्या दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा १५ खेळाडूंचा संघ येत्या काही दिवसांत जाहीर होईल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

पहिली कसोटी – बेंगळुरू: १६ ऑक्टोबर (बुधवार) – २० ऑक्टोबर (रविवार)
दुसरी कसोटी – पुणे: २४ ऑक्टोबर (गुरुवार) – २८ ऑक्टोबर (सोमवार)
तिसरी कसोटी – मुंबई: १ नोव्हेंबर (शुक्रवार) – ५ नोव्हेंबर (मंगळवार)

Story img Loader