Tim Southee Retirement News: २०२४ मध्ये अनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेटला अलविदा करत निवृत्ती घेतली आहे. त्यात आता अजून एक दिग्गज क्रिकेटपटू सामील झाला आहे. उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असण्याबरोबरच रोहित शर्मा सेहवागपेक्षाही सर्वाधिक षटकार मारणारा गोलंदाज म्हणून त्याने आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे. हा गोलंदाज इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेनंतर कसोटीतून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या घरच्या मालिकेनंतर टीम साऊदी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी ही माहिती दिली. पुढील जूनमध्ये न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी पात्र ठरल्यास साउथी निवडीसाठी उपलब्ध असेल. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ११ जूनपासून लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळवला जाईल.

हेही वाचा – Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर टीम साऊदी पत्रकार परिषदेत म्हणाला, “तीन मैदानांवर क्रिकेट खेळण्याची एक शेवटची संधी माझ्याकडे खूप आहे आणि अशी ३ मैदान जिथे मला खेळायला खूप आवडते. निवृत्ती घेणं हा एक कठीण निर्णय आहे पण मला वाटतं की तो योग्य आहे. संघाला काही चांगले तरुण गोलंदाज देखील मिळाले आहेत, त्यांच्याबरोबर खेळताना खूप छान वाटलं आणि त्यांना मी या काही काळात चांगल्या गोष्टी शिकवल्या असतील, मीही त्यांच्याकडून १-२ गोष्टी शिकलो. आता संघाला पुढे न्यायची जबाबदारी त्यांची आहे.

हेही वाचा – IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!

साऊदीने २००८ मध्ये इंग्लंडविरूद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि तो त्याचा अखेरचा कसोटी सामनाही इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने क्राइस्टचर्च (२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर) आणि वेलिंग्टन (६ ते १० डिसेंबर) येथे खेळवले जातील. अंतिम सामना १४ ते १८ डिसेंबर दरम्यान साऊदीच्या होम ग्राउंड सेडन पार्क हॅमिल्टन येथे खेळवला जाईल. सौदीने न्यूझीलंडसाठी १०४ कसोटी सामने खेळले असून ३८५ विकेट घेतले आहेत. न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सर रिचर्ड हॅडली (४३१) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…

साऊदीने २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तो ७७० विकेट्ससह सर्व फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. ३०० हून अधिक कसोटी विकेट्स, २०० एकदिवसीय विकेट आणि १०० टी-२० विकेट घेणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या नावावर कसोटीत फलंदाजीचा उत्कृष्ट विक्रम आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मापेक्षा जास्त षटकार मारले आहेत. साऊदीने कसोटीत ९३ षटकार मारले आहेत. कसोटीत सेहवागने ९१ तर रोहितने ८८ षटकार मारले आहेत.