Timing of matches of Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ या स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले होते. आशिया कपमध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी आशिया चषक एकदिवसीय (५० षटकांच्या) स्वरूपात खेळवला जाईल. त्याचबरोबर आता सर्व सामन्यांच्या वेळाही समोर आल्या आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजल्यापासून खेळवले जातील.
या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. सर्व संघांची ३-३ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळला गट-अ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि गतविजेता श्रीलंका यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल, ज्यामध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर-४ स्टेजचा समावेश असेल.
दोन देशांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानमध्ये आणि ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. पाकिस्तानमधील सामने लाहोर आणि मुलतान या शहरांमध्ये होणार आहेत. तसेच श्रीलंकेतील, ९ सामने कँडी आणि कोलंबोमध्ये खेळवले जातील. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तानातील लाहोर येथे होणार असून अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो, श्रीलंकेत होणार आहे. यादरम्यान पाकिस्तान संघ घरच्या मैदानावर ग्रुप स्टेजमध्ये फक्त एकच सामना (पहिला सामना) खेळणार आहे. त्याचवेळी २ सप्टेंबरला या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – RSWS 2023: सचिन-सेहवाग पाकिस्तानविरुद्ध पुन्हा करणार फटकेबाजी, ‘या’ स्पर्धेत येणार भारत-पाक आमनेसामने
आशिया कपची टायमिंग आणि वेळापत्रक –
३० ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतानमध्ये दुपारी ३:०० वाजता (ग्रुप स्टेज)
३१ ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, दुपारी ३:०० वाजता (ग्रुप स्टेज) कॅंडीमध्ये
२ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुपारी ३:०० वाजता कँडी (ग्रुप स्टेज)
३ सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोरमध्ये दुपारी ३:०० वाजता (ग्रुप स्टेज)
४ सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ, दुपारी ३:०० वाजता कँडी (ग्रुप स्टेज)
५ सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, दुपारी ३:०० वाजता लाहोर (ग्रुप स्टेज)
६ सप्टेंबर – लाहोरमध्ये A1 वि B2, दुपारी ३:०० (सुपर 4).
९ सप्टेंबर – कोलंबोमध्ये B1 वि B2, दुपारी ३:०० (सुपर 4)
१० सप्टेंबर – कोलंबोमध्ये A1 वि A2, दुपारी ३:०० (सुपर 4)
१२ सप्टेंबर – कोलंबोमध्ये A2 वि B1, दुपारी ३:०० (सुपर 4)
१४ सप्टेंबर – कोलंबोमध्ये A1 वि B1, दुपारी ३:०० (सुपर 4)
१५ सप्टेंबर – कोलंबोमध्ये A2 वि B2, दुपारी ३:०० वाजता (सुपर 4)
१७ सप्टेंबर – कोलंबोमध्ये अंतिम सामना दुपारी ३:०० वाजता