टय़ुरिन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने तिसऱ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडला पराभूत करत सहाव्यांदा ‘एटीपी’ दौऱ्यातील अखेरची स्पर्धा जिंकली. जोकोव्हिचने रूडवर ७-५, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत २०१५ नंतर पहिल्यांदा स्पर्धेचे जेतेपद मिळवले आणि फेडररच्या सहा जेतेपदांची बरोबरी साधली. जोकोव्हिचने गेल्या दोन हंगामांतही अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्याला पराभूत व्हावे लागले. ‘‘सात वर्षांचा कालावधी खूप मोठा असतो. या जेतेपदासाठी मी सात वर्षे प्रतीक्षा केली. त्यामुळे हे जेतेपद महत्त्वाचे आहे,’’ असे जोकोव्हिच म्हणाला. जोकोव्हिचने टेल अव्हिव्ह आणि अस्ताना येथे झालेल्या स्पर्धाचे जेतेपद पटकावले, तर पॅरिस मास्टर्सच्या अंतिम फेरीत धडक मारली. याशिवाय त्याने विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले.
नोव्हाक जोकोव्हिचला जेतेपद
सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने तिसऱ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडला पराभूत करत सहाव्यांदा ‘एटीपी’ दौऱ्यातील अखेरची स्पर्धा जिंकली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 22-11-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Title of serbia novak by djokovic defeated casper rude ysh