Dindigul Dragons vs Nellai Royal Kings match catch three players drop catch: सध्या तामिळनाडू प्रीमियर लीग २०२३ चा हंगाम सुरु आहे. या स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना दिंडीगुल ड्रॅगन्स आणि नेल्लई रॉयल किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नेल्लई रॉयल किंग्जच्या तीन खेळाडूंनी एक झेल सोडला. या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा झेल सोडल्यामुळे चाहत्यांना पाकिस्तान क्रिकेट संघाची आठवण झाली.
वास्तविक, स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना दिंडीगुल ड्रॅगन्स आणि नेल्लई रॉयल किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नेल्लई रॉयल किंग्जच्या तीन खेळाडूंनी मिळून एक झेल सोडला. या झेलनंतर चाहत्यांना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सईद अजमलचा २००८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सोडलेला झेल आठवला. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात ख्रिस गेलने उमर गुलच्या चेंडूवर शॉट मारला आणि चेंडू हवेत गेला. झेल पकडण्यासाठी सईद अजमलसोबत शोएब मलिकही पोहोचला आणि दोघेही एकमेकांवर विसंबले आणि कोणीही झेल घेण्यास पुढे गेला नाही.
आता नेमकी हीच घटना तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येही समोर आली आहे. प्रथम फलंदाजी करताना सुबोत भाटीने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डिंडीगुल ड्रॅगन्सकडून शॉट खेळला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या मागेत हवेत गेला. यष्टिरक्षकासह तीन खेळाडू झेल पकडण्यासाठी धावले, पण एकमेकांवर विश्वास ठेवून तिघांनीही झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे चेंडू तिघांच्या अगदी मध्यभागी पडला.
नेल्लई रॉयल किंग्जने सामन्यात बाजी मारली –
नेल्लई रॉयल किंग्ज आणि डिंडीगुल ड्रॅगन्स यांच्यात खेळला गेला. या क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात ड्रॅगन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १८५ धावा केल्या. संघासाठी शिवम सिंगने ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेल्लई रॉयल किंग्ज संघाने २० षटकांत ३ गडी राखून लक्ष्य गाठले. संघाकडून अजितेश गुरुस्वामीने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या.