घरच्या मैदानावरचा हंगाम गाजवल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारतात धावांचा रतीब घालणाऱ्या विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. अवघ्या ५ धावा काढून कोहली मॉर्कलच्या गोलंदाजीवर माघारी परतला होता. अशा परिस्थितीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीला खास कानमंत्र दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – IPL Retention: विराट कोहली ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या कॉलममध्ये सौरव गांगुलीने विराटला कर्णधार आणि फलंदाज या दोन भूमिकांमध्ये समन्वय साधणं गरजेचं असल्याचं म्हणलं आहे. “आफ्रिका दौऱ्यात विराट कोहली कसा खेळ करतो यावर अनेक गोष्टी अवलंबून राहणार आहेत. कर्णधार या नात्याने विराटचा आफ्रिकेचा पहिलाच दौरा असल्यामुळे एक फलंदाज आणि कर्णधार या दोन भूमिकांमध्ये समन्वय साधणं विराटसाठी गरजेचं आहे. अॅडलेड आणि सिडनीमध्ये विराटची कर्णधार म्हणून कामगिरी ही उल्लेखनीय राहिलेली आहे. त्यामुळे त्याचा हा फॉर्म आफ्रिकेतही कायम राहिली अशी अपेक्षा आहे.”

२०१७ हे वर्ष भारतासाठी चांगलं गेलेलं आहे. त्यामुळे आफ्रिकेत त्यांचा हा फॉर्म कायम रहावा अशी अनेकांची अपेक्षा असेल. मात्र दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवणं तितकसं सोप नाही. मात्र भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता हा कारनामा ते सहज करतील, असंही गांगुलीने नमूद केलं. याचसोबत आफ्रिकेत हार्दिक पांड्याला अधिकाधिक संधी मिळणं गरजेचं असल्याचंही गांगुली म्हणाला. दक्षिण आफ्रिकेत भारताला विजयी कामगिरी करायची असेल तर खेळपट्टी पाहून योग्य संघ निवड करणही गरजेचं असल्याचं गांगुलीने नमूद केलं.