आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला अंतिम चार संघांमध्ये पोहोचण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागणार असून सोमवारी त्यांचा सामना सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. दोन्ही संघांना आतापर्यंत स्पर्धेत छाप पाडता आलेली नसल्याने त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. मुंबईला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंत सातत्य राखता आलेले नाही, त्यामुळे त्यांना या दोन्ही आघाडय़ांवर मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर संघाचे योग्य समीकरणही त्यांना जुळवावे लागणार आहे.
हैदराबादने आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकले असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. हैदराबादची गोलंदाजी चांगली होत असली तरी फलंदाजीमध्ये त्यांनी अधिक मेहनत घेतल्यास त्यांना यश मिळू शकते.

Story img Loader