भारत-बांगलादेश यांच्यात आज अंतिम लढत; शाकिबच्या दुखापतीची यजमानांना चिंता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आशिया खंडातील सर्वोत्तम संघ कोणता? याचा फैसला रविवारी रात्री शेर ए बांगला स्टेडियमवर होणार आहे. संपूर्ण स्पध्रेत अष्टपैलू कामगिरीनिशी छाप पाडणारा भारतीय संघ विजेतेपदाचा निर्विवाद दावेदार मानला जात आहे. परंतु घरच्या मैदानावर पाकिस्तान, श्रीलंका यांच्यासारख्या दिग्गज संघांना हरवून अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करणाऱ्या बांगलादेशचे आव्हान सोपे नक्की नसेल. दरम्यान, बांगलादेशचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला दुखापत झाल्यामुळे संघाची चिंता वाढली आहे.

आयसीसी क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर आहे, तर बांगलादेश दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे कागदावर तरी भारताचा संघ बांगलादेशच्या तुलनेत श्रेष्ठ आहे. मात्र ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या षटकात सामन्याचे रूप पालटते. त्यामुळे आशियाई खंडातील सर्वोत्तमतेची ही लढाई रंगतदार होणार, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

बांगलादेशकडे तमिम इक्बाल, सौम्या सरकार, सब्बीर रेहमान, तस्किन अहमद यांच्यासारखे गुणी खेळाडू आहेत, तर भारताकडे जसप्रित बुमराह, आशिष नेहरा, आर. अश्विन, रोहित शर्मा यांच्यासारखी दमदार खेळाडूंची फळी आहे. दुखापतीमुळे स्पध्रेतून बाहेर पडलेल्या मुस्ताफिझूर रेहमानची उणीव बांगलादेशला तीव्रतेने भासेल.

आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेची उत्तम तयारी झाली आहे, याची आशियाई जेतेपद ही पोचपावती ठरेल, यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विश्वास आहे. प्रतिस्पर्धी संघनायक मश्रफी मुर्तझासाठी मात्र विश्वचषकाचे स्वप्न पाहणे, तितके सोपे नाही. कारण मुख्य स्पध्रेत पात्र होण्यासाठी बांगलादेशला धरमशाळा येथे पात्रता फेरीच्या अडथळ्यात नेदरलँड्स व आर्यलडशी भिडावे लागणार आहे. त्यामुळे ट्वेन्टी-२० विशेषज्ञ खेळाडूंचा संघ विरुद्ध सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्नशील असलेला संघ यांच्यातील हा सामना असेल. त्यामुळेच स्टेडियममध्ये हजारो समर्थकांचे पाठबळ असणाऱ्या बांगलादेशला नमवणे, धोनी ब्रिगेडसाठी सोपे नसेल.

धोनी, युवराज सिंग आणि विराट कोहलीसाठी मोठय़ा स्पध्रेची अंतिम फेरी खेळणे, हे काही नवे नाही. त्यांनी याआधी अशी अनेक आव्हाने लीलया पेलली आहेत. मात्र मश्रफी, शाकिब अल हसन आणि सब्बीर रेहमान यांच्यासाठी विजेतेपदाची गोडी ही काही औरच असेल. २०१२मध्ये ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते, मात्र अखेरच्या षटकात फक्त दोन धावा कमी पडल्यामुळे विजेतेपद निसटले. त्यामुळे पहिल्यावहिल्या आशियाई विजेतेपदाची मोठी उत्सुकता बांगलादेशला आहे.

‘सर्व अंगाने समतोल संघ’ असे धोनी सध्याच्या संघाविषयी म्हणतो. त्यामुळे दोन्ही संघांनी जरी आतापर्यंत स्पध्रेत चांगली कामगिरी बजावली असली तर भारताचा संघ परिपूर्ण आहे. मागील दहा ट्वेन्टी-२० सामन्यांपैकी ९ विजय हे भारताने मिळवले आहेत.

संघ

  • भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आशिष नेहरा, जसप्रित बुमराह, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, पवन नेगी, भुवनेश्वर कुमार.
  • बांगलादेश : मश्रफी मुर्तझा (कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्या सरकार, सब्बीर रेहमान, मशफकीर रहीम, शाकिब अल हसन, महमदुल्लाह रियाध, मोहम्मद मिथुन, अराफत सनी, तस्कीन अहमद, अल-अमिन हुसेन, नासिर हुसेन, अबू हैदर, नुरूल हसन, इम्रूल कायेस.
  • सामन्याची वेळ : सायं. ७ वाजल्यापासून.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.