Today is Kapil Dev’s 65th birthday : भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आज त्यांचा ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज सर्वजण कपिल देव यांना त्यांच्या खास दिवसासाठी शुभेच्छा देत आहेत. कपिल देव हे टीम इंडियाचे ते कर्णधार आहेत, ज्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला पहिला विश्वचषक जिंकून दिला. हा तो काळ होता जेव्हा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांना पराभूत करणे इतके सोपे नव्हते.

त्या काळात कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फक्त वेस्ट इंडिजसारख्या संघाला पराभूत केले नाही, तर विश्वचषक विजेतेपदही पटकावले. १९८३ च्या विश्वचषकात कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथमच आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील विश्वचषक विजयाने भारतीय क्रिकेटला एक नवा मार्ग दाखवला होता.

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!

कपिल देव यांनी एकही नो-बॉल टाकला नाही का?

१९८३ च्या विश्वचषकात टुनब्रिज वेल्स येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेली १७५ धावांची नाबाद खेळी कोण विसरू शकेल? तसेच कपिल देव यांच्याबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. कपिल देव यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही नो-बॉल टाकला नाही, असे अनेकांचे मत आहे. यासंबंधीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार भारत-पाक सामना

कपिल देव यांच्याबद्दल लोकांचा हा दावा चुकीचा आहे. कारण १९९४ मध्ये खेळल्या गेलेल्या सिंगर वर्ल्ड सीरिजच्या तिसऱ्या सामन्यात कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नो-बॉल टाकला होता. त्या सामन्यात दोन नो-बॉल टाकले होते. कपिलशिवाय भारताच्या मनोज प्रभाकरनेही नो-बॉल टाकला होता. त्या सिंगर वर्ल्ड सिरीजमध्ये भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि यजमान श्रीलंका सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला.

हेही वाचा – सिडनीच्या खराब ‘आउटफिल्ड’वर पाकिस्तानचा खेळाडू दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला, VIDEO होतोय व्हायरल

कपिल देव यांची क्रिकेट कारकीर्द –

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, कपिल देव यांनी टीम इंडियासाठी २२५ एकदिवसीय आणि १३१ कसोटी सामने खेळले. कपिल देव यांनी २२५ एकदिवसीय सामन्यांच्या २२१ डावांमध्ये ३७८३ धावा केल्या. या कालावधीत त्याने एक शतक आणि १४ अर्धशतके झळकावली. याशिवाय १३१ कसोटी सामन्यांच्या १८४ डावांमध्ये कपिल देवच्या नावावर ५२४८ धावा आहेत. कसोटीत त्याने ८ शतके आणि २७ अर्धशतके केली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना कपिल देव यांनी ४३४ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५३ विकेट्स घेतल्या. कपिल देव यांची क्रिकेट कारकीर्द अशी होती.