MS Dhoni’s birthday and on that occasion let’s know 10 special things about him: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी (७ जुलै) ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. ७ जुलै १९८१ रोजी रांची येथे जन्मलेल्या एमएस धोनीने क्रिकेट विश्वात पाऊल ठेवताच भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आणि आयसीसीसह प्रत्येक स्पर्धेची ट्रॉफी आपल्या नावावर केली. धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने आपल्या संघासाठी तीनही मोठ्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक यांचा समावेश आहे.

महेंद्रसिंग धोनी १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, तरीही तो अजूनही आयपीएलमध्ये त्याच्या संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. धोनीबद्दल अनेक रंजक गोष्टी आहेत ज्यामुळे तो महान बनतो. चाहते त्याची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. यापैकी कॅप्टन कूलच्या १० खास गोष्टी जाणून घेऊयात.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”

कॅप्टन कूलच्या १० खास गोष्टी –

१. महेंद्रसिंग धोनी हा आजचा सर्वोत्तम क्रिकेटर असेल पण त्याची पहिली पसंती फुटबॉलला होती. तो लहानपणी शाळेत गोलकीपिंगही करायचा. त्याचे कौशल्य पाहून त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक होण्यााचा सल्ला दिला. त्यानंतर क्रिकेटमध्ये धोनीने आपल्या यष्टीरक्षणाबरोबर फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.

हेही वाचा – MS Dhoni Birthday: धोनीच्या पाच मोठ्या कामगिरीने बदलले भारतीय क्रिकेटचे चित्र, ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिला कर्णधार

२. एकीकडे भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू अंडर-१९ मधून भारतीय संघात दाखल झाले आहेत. दुसरीकडे, धोनीची अंडर-१९ संघात निवड झाली नाही. मात्र याशिवाय त्याला त्याच्या टॅलेंटमुळे भारतीय संघात स्थान मिळाले.

३. एमएस धोनीने २०११ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये फक्त खिचडी खाल्ली होती आणि भारताला विश्वविजेता बनवले होते. नुकताच माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने याबाबत खुलासा केला आहे.

४. माहीला बाइक्सची खूप आवड आहे आणि त्याच्याकडे जगातील सर्वात महागड्या ते अनोख्या बाइक्स आहेत. त्याच्या घरात बाईक शोरूम देखील आहे ज्यामध्ये सर्व वाहने ठेवली आहेत.

५. निवृत्तीनंतर धोनीने आता शेतीवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. झारखंडमध्येच त्याचे मोठे शेती फार्म आहे, ज्याला तो नियमित भेट देतो. अलीकडेच, तो एका कामगाराला त्याच्या दुचाकीवरून शेतात सोडायला जातानाचा व्हिडीओ समोर आला होता.

हेही वाचा – Mohammad Shami: सुप्रीम कोर्टाचा मोहम्मद शमीला मोठा झटका, चार वर्षे जुन्या प्रकरणाची पुन्हा होणार सुनावणी

६. धोनीचा ट्रेड मार्क हेलिकॉप्टर शॉट आहे. हा शॉट त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा खेळून चेंडू सीमापार पाठवला आहे. माही अजूनही आयपीएलमध्ये हा शॉट खेळताना दिसतो.

७. महेंद्रसिंग धोनीला लष्कराने लेफ्टनंट कर्नलची मानद रँक दिली आहे. अनुभवी अष्टपैलू कपिल देव यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारा माही हा दुसरा क्रिकेटर आहे. इंडियन टेरिटोरियल आर्मीने २०११ मध्ये धोनीला लेफ्टनंट कर्नल पद देऊन सन्मानित केले होते.

८. एमएस धोनीने साक्षीशी ४ जुलै २०१० रोजी डेहराडूनमध्ये लग्न केले. एंगेजमेंटच्या दुसऱ्याच दिवशी धोनीने लग्न केले होते. आज साक्षी आणि धोनी झिवा नावाच्या मुलीचे पालक आहेत.

९. एमएस धोनी २००८ आणि २००९ मध्ये आयसीसी एकदिवसीय प्लेयर ऑफ द इयर होता. त्याला २००९ मध्ये पद्मश्री आणि २०१८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – Asian Games 2023: भारताचा कर्णधार पवन सेहरावतने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीबाबत सांगितले; म्हणाला, “जर तुम्हाला गोल्ड…”

१०. धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात रनआऊटने केली आणि शेवटही रनआऊटने केला. डिसेंबर २००४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तो रनआऊट झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध रनआऊट झाला.

Story img Loader