Rahul Dravid Birthday Special: आज (११ जानेवारी) भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा वाढदिवस आहे. द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेला द्रविड ५० वर्षांचा झाला आहे. क्रीडा जगतातील दिग्गजांसह चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर शुभेच्छा वर्षाव करत आहेत. १९७३ मध्ये इंदूरमध्ये जन्मलेल्या द्रविडची स्वतःची एक वेगळी शैली आहे. तो त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो.

पण द्रविडलाही राग येतो हे चाहत्यांना माहीत आहे का? की ‘दीवार’ आणि ‘मिस्टर ट्रस्टवर्दी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला एकदा पाकिस्तान दौऱ्यावर प्रचंड राग आला होता. हा राग त्याला एका पत्रकार परिषदेदरम्यान आला होता, जेव्हा द्रविडने एका पत्रकाराला बाहेर काढायला सांगितले होते.

aditya roy kapoor
रुपेरी पडद्यावरील सच्चा प्रेमी आदित्य रॉय कपूर खऱ्या आयुष्यात पडला ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rohit sharma ritika sajdeh blessed with a baby boy Posts Goes Viral on Social Media
Rohit Sharma Blessed with Boy: ज्युनियर हिटमॅन, रोहित शर्माला मुलगा झाला? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; पोस्टचा महापूर
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
Eknath SHinde Ravi Rana
Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”
Prithvi Shaw Dance Video Viral of his 25th Birthday Party Trolled for Disciplinary Issues in Ranji Trophy
Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा वाढदिवसाच्या पार्टीत ‘तांबडी चामडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर होतोय ट्रोल, VIDEO व्हायरल
dharmaveer producer mangesh desai writes special post for pravin tarde
“धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…

मॅच फिक्सिंगच्या नावाने संतापला होता द्रविड –

ही घटना २००४ मध्ये भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर घडली होती. या कसोटी मालिकेत द्रविडची बॅट खूपच तळपली होती. त्याने ३ सामन्यांच्या ४ डावात ३०९ धावा केल्या. याच पाकिस्तान दौऱ्यावर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने मॅच फिक्सिंगबाबत प्रश्न केला होता. ज्यावरुन राहुल द्रविड प्रचंड संतापला होता.

यावर टीम इंडियाची भिंत म्हटला जाणारा राहुल द्रविड चांगलाच संतापला. तेव्हा द्रविड जाहीरपणे म्हणाला, ”या व्यक्तीला (रिपोर्टर) कोणीतरी बाहेर काढा. हा मूर्खपणा आहे आणि अशा गोष्टी खेळासाठी वाईट आहेत.”

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्यांदा भडकला होता द्रविड –

द्रविडला राग येण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही. यानंतर २००६ मध्ये राहुल द्रविड पुन्हा एकदा चांगलाच भडकला होता. ही घटना इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेदरम्यान घडली होती. त्या मालिकेत द्रविड संघाचा कर्णधार होता. यादरम्यान इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

या पराभवामुळे संतप्त झालेल्या द्रविडने ड्रेसिंग रूममध्ये खुर्ची आपटली. खरे तर त्या विजयासह इंग्लंड संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता आली. अशा स्थितीत द्रविडला पराभव सहन झाला नाही आणि तो संतापला होता.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: …म्हणून टीम इंडियाने मुद्दाम शनाकाला शतक झळकावू दिले: खुद्द रोहित शर्माने खुलासा केला

द्रविडने गांगुलीसोबत केले होते पदार्पण –

राहुल द्रविड आणि दुसरा माजी कर्णधार सौरव गांगुली या दोघांनी १९९६ मध्ये लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केले होते. गांगुलीने पहिल्या कसोटी डावात शतक झळकावले, तर द्रविडचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. परंतु २००२ मध्ये, द्रविडने सलग चार कसोटी शतके झळकावली, ज्यात हेडिंग्ले येथे कठीण परिस्थितीत 148 शतकी खेळीचा समावेश होता.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: टीम इंडिया सावधान! ऑस्ट्रेलियाने ४ फिरकीपटूंसह १८ सदस्यीय संघ केला जाहीर

राहुल द्रविडची क्रिकेट कारकीर्द –

१६४ कसोटी – १३२८८ धावा – ३६ शतके – ६३ अर्धशतके
३४४ वनडे – १०८८९ धावा – १२ शतके – ८३ अर्धशतके
१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामना – ३१ धावा