पीटीआय, मुंबई

मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स संघ इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रविवारी एकमेकांसमोर येतील, तेव्हा दोन्ही संघांचा प्रयत्न विजय मिळवण्याचा असणार आहे.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम

या सामन्यात सर्वाधिक लक्ष हे आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे असेल. कारण, दुखापतीतून तो पुनरागमन करीत आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेले आपले तिन्ही सामने गमावले आहेत व गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. त्यामुळे स्पर्धेत आपले आव्हान टिकवायचे झाल्यास मुंबईला आपली कामगिरी उंचवावी लागेल. दुसरीकडे, दिल्लीची स्थिती फारशी चांगली नाही. त्यांना चारपैकी एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. ते गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघांवर चांगल्या कामगिरीचा दबाव आहे. या सामन्यात मुंबईचा संघ पहिला विजय नोंदवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

हेही वाचा >>>IPL 2024, RR vs RCB : बटलरचं शतक कोहलीच्या शतकावर भारी, राजस्थानने साकारला बंगळुरूवर विजय

पंत, वॉर्नरवर मदार

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने गेल्या दोन सामन्यांत अर्धशतक झळकावल्याने तो चांगल्या लयीत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला सहकार्य मिळालेले नाही. पंतने चार सामन्यांत १५२ धावा केल्या आहेत. दिल्लीच्या गोलंदाजांनी गेल्या महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करताना त्यांच्याविरुद्ध ७ बाद २७२ धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाला १६६ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास दिल्लीला आपली कामगिरी उंचवावी लागेल. विशेषकरुन गोलंदाजांना छाप पाडावी लागेल. दिल्लीला डेव्हिड वॉर्नरकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा असणार आहे. तसेच, आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पृथ्वी शॉचा प्रयत्न कामगिरी उंचावण्याचा राहील.

रोहित, तिलककडून अपेक्षा

सूर्यकुमार तंदुरुस्त झाल्याने या सामन्यात त्याचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. ‘आयपीएल’नंतर होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेकडे पाहता त्याच्या कामगिरीवरही सर्वाचे लक्ष राहील. सूर्यकुमारला दुखापत झाल्याने तो तीन महिन्यांहून अधिक काळ मैदानाबाहेर होता. शुक्रवारी त्याने मुंबईच्या सराव सत्रातही सहभाग नोंदवला व त्याने चांगला सराव केला. मुंबईच्या संघाने आतापर्यंत प्रत्येक विभागात निराशा केली आहे. फलंदाजीत रोहित शर्मा इशान किशन यांनी संघाला चांगली सुरुवात दिली असली, तरीही त्यांना मोठी खेळी करता आलेली नाही. तिलक वर्मा व नमन धीरकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. मुंबईच्या गोलंदाजीबाबत विचार केल्यास जसप्रीत बुमरा व आकाश मढवाल वगळता अन्य गोलंदाजांना चमक दाखवता आलेली नाही.

’ वेळ : दुपारी ३.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.

Story img Loader