भारतीय संघाने तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम करुन दाखवलाय. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० ने नमवून उपांत्यफेरीत प्रवेश केलाय. भारतीय महिलांनी केलेल्या या कामगिरीनंतर सोशल नेटवर्किंगवरही मोठ्याप्रमाणात आनंद व्यक्त केला जात असून ट्विटरवरील टॉप ट्रेण्डींग विषयांपैकी अनेक हॅशटॅग हे याच सामन्यासंदर्भातील आहेत. विशेष म्हणजे भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही मीम शेअर करत भारतीय महिलांना शुभेच्छा दिल्यात.
नक्की पाहा हे १० फोटो >> एक.. दोन.. तीन.. दे धक्का… भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतरचे मैदानावरील फोटो
सरकारच्या पत्रसूचना विभागानेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलने म्हणजेच पीआयबी इंडियाने एक मीम शेअर केलं आहे. हे मीम पार्टनर या हिंदी चित्रपटामधील आहे. या मीममध्ये अभिनेता गोविंदा आणि सलमान खान दिसत आहेत. पार्टनर चित्रपटामध्ये मुलीला पटवून देण्यास मदत करणाऱ्या लव्ह गुरु सलमान खानच्या सल्ल्यानुसार काम झाल्यानंतर गोविंदाच्या कॅरेक्टरला भारवावून गेल्यानंतर सर्दीचा त्रास होतो असं दाखवण्यात आलंय. अती आनंदात गोविंदा अनेकदा नाक पुसत “इतनी खुशी… इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई”, असं म्हणण्याची सवय असते. हेच मीम नेटकरी अनेकदा सोशल नेटवर्किंगवर काही चांगलं घडल्यानंतर शेअर करत असतात. हेच मीम चक्क भारत सरकारने शेअर केलं आहे. अनेक नेटकरी त्यावर मजेदारपद्धतीने प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
#India writes history.. Women’s hockey team enters Olympics semi-final for the 1st time #Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/epJuWl8pdW
— PIB India (@PIB_India) August 2, 2021
४१ वर्षानंतर पहिल्यांदाच…
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केलाय.
पहिल्याच क्वार्टरमध्ये शर्मिला देवी बाहेर…
खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं. जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला.
#OlympicGames | Hockey, Women’s Quarter-final: India beat Australia 1-0, enter semis. pic.twitter.com/aosCK1y9gC
— ANI (@ANI) August 2, 2021
भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल नेटवर्किंगवर मीमचा पाऊस पडताना दिसत आहे.