टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला आहे. चीनी तैपेईच्या ताई जू यिंगकडून सिंधूला १८-२१, १२-२१ अशा सरळ सेटमध्ये मात पत्करावी लागली. यिंगने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश नोंदवला आहे. ताय जू यिंग ही विश्वातील अग्रगण्य बॅडमिंटनपटू आहे. या सामन्यापूर्वी सिंधूविरुद्ध तिची आकडेवारी १३-५ अशी होती.
#TokyoOlympics: Indian shuttler PV Sindhu loses to Tai Tzu-ying of Chinese Taipei 18-21, 12-21 in women’s singles semi-final, to play for bronze tomorrow pic.twitter.com/qaZFyMlhin
— ANI (@ANI) July 31, 2021
हेही वाचा – ‘हॅट्ट्रिक’ गर्ल वंदना : फक्त वडिलांमुळं पूर्ण झालं हॉकीपटू बनण्याचं स्वप्न!
रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत कठीण आव्हान सादर करू शकली नाही. पहिल्या गेममध्ये ती चांगली प्रतिकार करत होती. पण दुसऱ्या गेममध्ये ताई जू यिंग तिच्यावर वरचढ ठरली. कांस्यपदकाच्या लढतीत ती बिंगजाओसमोर खेळणार आहे. याआधी सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एकही सेट गमावला नव्हता. मात्र या सामन्यात यिंगने तिचा प्रवास थांबवला.
उपांत्यपूर्व लढतीत सिंधूने यामागुचीला हरवले
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या २६ वर्षीय सिंधूने ५६ मिनिटे रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतीत यामागुचीला २१-१३, २२-२० असे सरळ दोन गेममध्ये नामोहरम केले. सिंधूचा हा यामागुचीविरुद्ध १२वा विजय ठरला.