भारतीय महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पूल-ए च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४-३ असा पराभव केला. यामुळे टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी भारताच्या आशा कायम राहिल्या आहेत. भारतासाठी वंदना कटारियाने हॅट्ट्रिकची नोंद करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वंदना कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
‘‘हॉकी खेळणे फक्त वडिलांमुळेच शक्य झाले”
मेरठ येथून टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचा प्रवास सुरू करणाऱ्या वंदनाने आपल्या हॉकीमागील प्रेरणेची गोष्ट सांगितली होती. ती म्हणाली, ”हॉकी खेळणे फक्त वडिलांमुळेच शक्य झाले. कारण कुटुंबातील कोणालाही मी हॉकीपटू बनावे, असे वाटत नव्हते. माझ्या वडिलांनी कोणालाही न कळता लखनऊ स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतला होता.” वंदनाच्या आईलाही ही गोष्ट माहीत नव्हती.
History has been made.
Vandana Katariya scores the first-ever hat-trick for the Indian Women’s Hockey Team in the Olympics. #INDvRSA #IndiaKaGame #TeamIndia #Tokyo2020 #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/DPshZMj36I
— Hockey India (@TheHockeyIndia) July 31, 2021
२०१३च्या दरम्यान ज्युनियर विश्वचषक सामना जर्मनीमध्ये खेळला जात होता. यादरम्यान भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली. वंदना कटारिया यांचाही त्या संघात समावेश होता. लखनऊ स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वंदनाची ज्युनियर हॉकी संघात निवड झाली. यापूर्वी वंदनाने मेरठ येथून आपला क्रीडा प्रवास सुरू केला होता. मेरठमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर ती लखनऊला गेली. भारतीय संघाने ज्युनियर विश्वचषक सामन्यात कांस्यपदक जिंकले. यादरम्यान, वंदनाने पाच सामन्यांत चार गोल केले.
हेही वाचा – श्रीलंकेचं कौतुक काही थांबेना..भारताला मात दिल्यानंतर मिळालं ‘इतक्या’ लाखांचं बक्षीस!
ऑलिम्पिकपूर्वी वंदनाच्या वडिलांचे झाले निधन
ज्युनियर हॉकी संघात वंदनाच्या चमकदार कामगिरीनंतर जेव्हा मीडिया तिच्या घरी पोहोचली, तेव्हा वंदनाचे वडील नहर सिंह यांच्या डोळ्यात अश्रू होते. वडिलांची छाती अभिमानाने रुंदावली. हा क्षण कधीही विसरणार नाही, असे वंदनाने सांगितले होते. वंदनाच्या वडिलांचे ३० मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या काळात वंदना बंगळुरूमध्ये ऑलिम्पिकची तयारी करत होती.