टोक्यो ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी म्हणजेच बुधवारी तीन महिला क्रीडापटूंच्या कामगिरीने भारताला पदकाची आशा दाखवली असतानाच आज बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, भारतीय हॉकी संघाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश करत दोन क्रिडा प्रकारांमध्ये पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढं टाकलं आहे. असं असतानाच दुसरीकडे तिरंदाजीमध्ये अतानू दासने अंतीम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे अंतिम १६ मध्ये आपलं स्थान निश्चित करताना अतिशय अटीतटीच्या सामन्यात अतानूने ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचाही पराभव केलाय.
नक्की पाहा >> ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं; ५ कोटी रुपये, घर भेट म्हणून मिळालं
अतानू दासने आधी चीनी ताइपेच्या डेंग यू-चेंगचा ६-४ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. अतानूने हा सामना २७-२६, २७-२८, २८-२६, २७-२८ आणि २८-२६ असा जिंकला. पुढील फेरीमध्ये अतानूने अगदी अटीतटीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या ऑलम्पिक गोल्ड मेडलिस्ट ओ जिन्ह्येकचा शूट ऑफमध्ये पराभव केला. सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून अनातूने अंतिम १६ खेळाडूंमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
नक्की वाचा >> Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक; पदकापासून केवळ दोन विजय दूर
पहिल्या सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर अतानूने पुढील दोन सेटमध्ये चांगली कामगिरी केली. चौथ्या सेटमध्ये अतानूने २७-२२ च्या फरकाने विजय मिळवला. पाचव्या सेटमध्ये स्कोअर २८-२८ च्या बरोबरीत होता. त्यामुळे शूट ऑफच्या माध्यमातून या सामन्याचा निकाल लावण्यात आला. अतानूने ६-५ च्या फरकाने शूट ऑफमध्ये विजय मिळवला. पहिला सेट २६-२५ ने गमावल्यानंतर अतानूने जबरदस्त कमबॅक करत गोल्ड मेडलिस्टला पराभूत केलं. चौथा सेट अतानूने २७-२२ असा जिंकला होता. शूट ऑफमध्ये जिन्ह्येकने ९ चा स्कोअर केला तर अतानूने लक्ष्याचा अचूक वेध घेत परफेक्ट १० स्कोअर केला.
नक्की वाचा >> Tokyo Olympics Hockey: चक दे इंडिया… भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली; उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित
Men’s Archery: Atanu Das defeats Oh JinHyek from South Korea, 6-5 in 1/16 Eliminations #Tokyo2020 #Cheer4India pic.twitter.com/jaR3CFdwOs
— All India Radio News (@airnewsalerts) July 29, 2021
बुधवारी तिरंदाजीमध्ये थोडी खुशी थोडा गम…
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या भारताच्या दीपिका कुमारीने बुधवारी तिरंदाजी प्रकारात महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठून पदकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पुरुषांमध्ये प्रवीण जाधव, तरुणदीप राय यांना मात्र गाशा गुंडाळावा लागला. रांचीच्या २७ वर्षीय दीपिकाने एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जेनिफर फर्नाडेझला ६-४ (२५-२६, २८-२५, २७-२५, २४-२५, २६-२५) असे पराभूत केले. त्याआधी, बाद फेरीतील सामन्यात दीपिकाने भूतानच्या कर्माला ६-० (२६-२३, २६-२३, २७-२४) अशी धूळ चारली.पुरुषांच्या एकेरी फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसनने महाराष्ट्राच्या प्रवीणचा ६-० (२८-२७, २७-२७, २६-२३) असा धुव्वा उडवून त्याचे आव्हान संपुष्टात आणले. त्यापूर्वीच्या लढतीत प्रवीणने रशियाच्या गॅल्सन बार्झाझापोव्हला ६-० (२९-२७, २८-२७, २८-२४) असे नमवले होते. तरुणदीपने बाद फेरीत युक्रेनच्या ओलेक्स हनबिनला ६-४ (२५-२५, २७-२८, २७-२७, २६-२४, २८-२५) असे पराभूत केले. मात्र उपउपांत्यपूर्व लढतीमध्ये इस्रायलच्या इटे श्ॉनीने ६-५ (२८-२४, २६-२७, २७-२७, २७-२८, २८-२७) अशी शूट-ऑफमध्ये सरशी साधल्याने तरुणदीपची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी हुकली.