भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिलने धमाकेदार कामगिरी करत द्विशतक क्लबमध्ये प्रवेश केला आहे. गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात २०८ धावांची धडाकेबाज खेळी केली. यामुळे टीम इंडियाने हा सामना १२ धावांनी जिंकला.
गिलच्या या शानदार खेळीमागे त्याला दोन जीवदान मिळालेले जीवदान महत्वाचे ठरले. न्यूझीलंडचा कर्णधार आणि यष्टीरक्षक टॉम लॅथमने दिलेल्या एका चेंडूवर त्याला ही जीवनरेखा मिळाली. गिलला ही जीवदान मिळाले नसते, तर त्याची खेळी केवळ ४५ धावांमध्ये संपुष्टात आली असती.
लॅथमने गिलला दोन जीवदान दिले –
वास्तविक, गिलला हे जीवदान डावाच्या १९व्या षटकात मिळाले. हे षटत ऑफ स्पिनर ऑलराऊंडर मायकल ब्रेसवेल टाकत होता. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर गिलने पुढे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गिल चेंडू फटकावण्यात चुकला आणि चेंडू सरल मागे यष्टीरक्षकाकडे गेला. ज्यामध्ये चेंडूने गिलच्या बॅटची चेंडू कडा घेतली होती.
हा झेल अवघड नव्हता, पण यष्टिरक्षक लॅथमला तो पकडता आला नाही. हा झेल गमावणे ही गिलसाठी पहिले जीवदान होते. यानंतर लगेचच यष्टीरक्षक लॅथमकडे गिलला यष्टीचित करण्याची संधी होती, कारण गिल क्रीजच्या बाहेर पोहोचला होता. पण याला लॅथमचे दुर्दैव म्हणा किंवा गिलचे नशीब म्हणा. ती देखील यष्टीचित करण्याची संधी हुकली.
हेही वाचा – माजी कर्णधार मायकल क्लार्कवर नात्यात फसवणूक केल्याचा आरोप; भरस्त्यात गर्लफ्रेंडने कानशिलात…., पाहा VIDEO
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय –
याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गिलला एकाच चेंडूवर दोन जीवदान कसे मिळाले हे स्पष्टपणे दिसत आहे. या चेंडूआधी गिलने ४८ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. त्याच्यासोबत नॉन स्ट्राइकवर इशान किशन उपस्थित होता. जीवदानाचा फायदा घेत गिलने १४९ चेंडूत २०८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १९ चौकार आणि ९ षटकार लगावले.