Gambhir has played an important role in retaining Russell and Narine : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडीने दोन वेळा आयपीएल विजेते कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) ने त्यांचे दोन दिग्गज आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांना कायम ठेवले आहे. याबद्दल टॉम मूडीने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. वेस्ट इंडिजच्या या दोन खेळाडूंना कायम ठेवण्यात नुकतीच संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त झालेल्या गौतम गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली, असे टॉम मूडीचे मत आहे.
आंद्रे रसेल आणि सुनील नरेन हे केकेआर फ्रँचायझीचे गेल्या अनेक मोसमात महत्त्वाचे खेळाडू राहिले आहेत. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली, रसेल २०१४ मध्ये आणि २०१२ मध्ये नरेन केकेआर संघात सामील झाले होते. त्यानंतर दोघेही फ्रँचायझीचे सर्वात महत्त्वाचे खेळाडू म्हणून उदयास आले. मात्र, गेल्या काही मोसमात या दोघांची कामगिरी तितकीशी खास राहिली नाही. त्यामुळे केकेआर या दोन कॅरेबियन खेळाडूंना करारमुक्त करेल, अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही.
ईएसपीएन क्रिकइन्फोवर कोलकाता नाईट रायडर्सचा नवीन मार्गदर्शक गौतम गंभीरचा संदर्भ देताना, टॉम मूडीने आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांच्या कायम ठेवण्याबद्दल सांगितले. टॉम मूडी म्हणाले, “रसेल आणि नरेन या दोघांसाठी हे वर्ष महत्त्वाचे असणार आहे. हे दोघेही केकेआरसाठी अभूतपूर्व क्रिकेटपटू आहेत आणि खरोखरच त्यांच्या इतिहासाचा एक भाग आहेत. मला वाटते की, रसेल आणि नरेनला कायम ठेवण्यात गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गंभीरने त्यांना समजू शकतो. कारण तो त्यांच्यासोबत खेळला आहे. त्याने केकेआरचे कर्णधारपद भूषवले आहे आणि तो त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेऊ शकेल.”
उल्लेखनीय म्हणजे आंद्रे रसेलने आयपीएलमध्ये २,२०० हून अधिक धावा आणि ९६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर सुनील नरेनच्या नावावर १६३ विकेट्स आहेत. या दोन खेळाडूंसाठी शेवटचा हंगाम खास नव्हता. अशा परिस्थितीत आयपीएल २०२४ ही त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी असेल.