Tom O Connell gets out twice in BPL 2024-25 : सध्या बांगलादेशमध्ये बांगलादेश प्रीमियर लीग २०२४-२५ चा हंगाम खेळला जात आहे. या क्रिकेट लीगमध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली आहे. वास्तविक, या स्पर्धेतील तिसरा सामना खुलना टायगर्स आणि चितगाव किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात खुलना टायगर्सच्या खेळाडूसोबत असे काही घडले, जे क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच पाहायला मिळते. या खेळाडूने सामन्यात केवळ १ चेंडू खेळला, परंतु दोनदा आऊट झाला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर एक विचित्र घटना घडली आहे.

वास्तविक, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान टाइमआउटचा वाद प्रकाशझोतात आला होता. श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट देण्यात आले होते. आयसीसीच्या नियमांनुसार, फलंदाज बाद झाल्यावर तीन मिनिटांत नवीन फलंदाजाला क्रीजवर यावे लागते. त्याचवेळी विश्वचषकात ही वेळ केवळ दोन मिनिटांची होती. मात्र अँजेलो मॅथ्यूजला त्यात अपयश आले होते. आता अशीच एक घटना बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये चितगाव किंग्जचा खेळाडू टॉम ओ’कॉनेलसोबत घडली आहे. ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर टॉम ओ’कॉनेल तीन मिनिटे पूर्ण झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आला, त्यानंतर त्याला अंपायरने आऊट घोषित केले.

Harshit Rana makes T20I debut as concussion substitute against England
IND vs ENG: हर्षित राणाचं चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अनोखं पदार्पण, पहिल्याच षटकात घेतली विकेट; नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
U19 Eng vs SA bizarre run out as Aaryan Sawant video viral
U19 ENG vs SA : धक्कादायक! विचित्र रनआऊटच्या नादात थोडक्यात वाचला फिल्डर, VIDEO होतोय व्हायरल
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
IND vs ENG Jos Buttler becomes first player to score 600 runs in T20 cricket against India
IND vs ENG : जोस बटलरचा भारताविरुद्ध मोठा पराक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
Nicholas Pooran withdraws Tom Curran run out appeal after a bizarre incident in ILT20 Video viral
Tom Curran run out : ILT20 मध्ये अजब नाट्य! रन आऊट झाल्यानंतरही टॉम करनला परत बोलावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

एक चेंडू खेळला पण दोनदा झाला आऊट –

यानंतर खुलना टायगर्सचा कर्णधार मेहदी हसन मिराजने टॉम ओ’कॉनेलला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला. यानंतर सर्वजण मेहदी हसन मिराजचे कौतुक करत आहेत. या घटनेदरम्यान, कर्णधार मेहदी त्याच्या अनेक सहकाऱ्यांसह अंपायरकडे गेला आणि त्याच्याशी बोलल्यानंतर टॉम ओ’कॉनेलला परत बोलावले. पण टॉम ओ’कॉनेलला या संधीचा फायदा घेता आला नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. म्हणजेच या सामन्यात तो एकच चेंडू खेळू शकला आणि दोनदा बाद झाला.

हेही वाचा – Oshane Thomas : कॅरेबियन खेळाडूने चक्क एका चेंडूवर दिल्या १५ धावा, काहीही पण हे झालं कसं? पाहा VIDEO

खुलना टायगर्स संघाने मारली बाजी –

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर खुलना टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ गडी गमावून २०३ धावा केल्या होत्या. या संघासाठी विल्यम बोसिस्टोने ५० चेंडूत नाबाद ७५ धावा केल्या. तर महिदुल इस्लाम अंकोनने २२ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. दुसरीकडे, चितगाव किंग्ज संघ केवळ १८.५ षटकेच खेळू शकला आणि १६६ धावांवर गारद झाला. त्यामुळे चितगाव किंग्ज संघाला ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला.

Story img Loader