नवी दिल्ली : अलीकडच्या काळात सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये अति खेळ होत असल्यामुळेच अष्टपैलू क्रिकेटपटू घडण्याचे मार्ग बंद होत आहेत, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने व्यक्त केले. याचा सर्वाधिक फटका कसोटी क्रिकेटमध्ये बसत आहे.
सर गारफिल्ड सोबर्स (८०३२ धावा आणि २३५ बळी) यांना क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानले जाते. त्यानंतर आधुनिक क्रिकेटमध्ये तीनही प्रारूपांत खेळताना कॅलिसने एकत्रित २० हजार धावा आणि ६०० गडी बाद केले आहेत. सोबर्स यांच्या नंतर १९८०च्या दशकात इमरान खान, रिचर्ड हॅडली, इयन बॉथम, कपिलदेव हे सर्वोत्तम अष्टपैलू होते. या खेळाडूंचा काळ संपल्यावर अँड्रयू फ्लिंटॉफ आणि जॅक कॅलिस यांची नावे घेतली जातात.
हेही वाचा >>> भारतीय महिला संघाकडून निराशा; इंग्लंडकडून पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ३८ धावांनी पराभूत; शफालीची एकाकी झुंज
मात्र, ट्वेन्टी-२० क्रिकेटचे आगमन, त्याचा वाढता प्रभाव, नियमात झालेले बदल यामुळे बहुविध कौशल्य असलेले क्रिकेटपटू घडण्याची प्रक्रियाच थंडावली. या सगळय़ावर कॅलिसने आपल्या फलंदाजीप्रमाणे सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. कॅलिस म्हणाला,‘‘या प्रश्नाचे उत्तर देणे किंवा शोधणे खूप कठीण आहे. अष्टपैलू खेळाडू काही एका दिवसात घडत नसतो. इतिहासाकडे वळून बघितले की हे लक्षात येईल. हे सगळे किती क्रिकेट खेळले जाते यावर अवलंबून आहे.’’
कॅलिसने या वेळी ‘आयपीएल’चा उल्लेख न करता या लीगमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) या नियमावर नाराजी व्यक्त केली. ‘‘या नियमामुळे संघ अष्टपैलू खेळाडूला आपोआप दूर करत आहेत. अंतिम अकरा खेळाडूमधून एकाला सामना सुरू असताना बदलणे आणि त्या बदललेल्या खेळाडूला खेळण्याची संधी देणे हा नियम आपल्याला काही पटत नाही,’’ असे कॅलिसने सांगितले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला संघ खूप चांगला आहे. पण, दक्षिण आफ्रिकेला मायदेशात हरवणे खूप कठीण आहे. मालिकेतील सेंच्युरियन हे केंद्र यजमान संघासाठी पूरक आहे, तर न्यूलँड्समध्ये भारताला पोषक वातावरण असेल. त्यामुळे नेहमीप्रमाणे ही मालिका चुरशीची होईल. – जॅक कॅलिस