न्यूझीलंड दौऱयात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होत असताना क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय संघाची पाठराखण केली. संघाची पराभवाची मालिका सुरू झाली की यातून सावरणे जरा कठीण जाते असे गौतम गंभीरचे म्हणणे आहे.
गौतम गंभीर म्हणाला की, जेव्हा संघ विदेश दौऱयावर जातो तेव्हा संघाची सुरूवात विजयाने होणे महत्वाचे ठरते याची पुढील सामन्यात सातत्य राखण्यास मदत होते आणि जेव्हा तुम्ही पहिले काही सामने हरता तेव्हा अशा पराभवाच्या मालिकेतून पुनरागमन करणे संघासाठी कठीण जाते. असेही गंभीर म्हणाला. तसेच न्यूझीलंडला पहिल्या दोन सामन्यात विजय नोंदविता आला हीच त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट ठरली. त्यातून मिळालेल्या आत्मविश्वासाने त्यांना मालिका जिंकता आली. तसेच प्रतिस्पर्धी संघाचे गुण तुमच्यापेक्षा अधिक असावेत अशी तुमची केव्हाच इच्छा नसते त्यामुळे विजयी सुरूवात होणे महत्वपूर्ण ठरते. कसोटी मालिकेत भारत नक्की पुनरागमन करेल असा विश्वासही गंभीरने यावेळी व्यक्त केला.

Story img Loader